१ कोटीचं बक्षीस व १७० गुन्हे असलेल्या जहाल नक्षलवादी तारक्कासह ११ माओवाद्यांचं मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  १ कोटीचं बक्षीस व १७० गुन्हे असलेल्या जहाल नक्षलवादी तारक्कासह ११ माओवाद्यांचं मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण

१ कोटीचं बक्षीस व १७० गुन्हे असलेल्या जहाल नक्षलवादी तारक्कासह ११ माओवाद्यांचं मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण

Jan 01, 2025 07:07 PM IST

Gadchiroli Naxalite : जहाल महिला माओवादी नेता तारक्कासह ११ नक्षलवाद्यांनी आज गडचिरोलीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले.

११ माओवाद्यांचं मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण
११ माओवाद्यांचं मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या उपस्थितीत गडचिरोलीत सी-६० जवानांचा सत्कार सोहळा आणि माओवाद्यांचा आत्मसमर्पणाचा कार्यक्रम पार पडला. जहाल महिला माओवादी नेता तारक्कासह ११ नक्षलवाद्यांनी आज गडचिरोलीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. तारक्का ही माओवाद्याच्या संघटनेचं देशभरातलं दुसऱ्या क्रमांकाचं नेतृत्व असलेल्या केंद्रीय समिती सदस्य भूपतीची पत्नी तर बंगालमध्ये चकमकीत ठार झालेला जहाल माओवादी नेता किशनजीची वहिनी आहे. तारक्का१९८३मध्ये माओवाद्यांच्या संघटनेत दाखल होणारी गडचिरोलीतली पहिली महिला माओवादी आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अहेरी ते गरदेवाडा बस स्वातंत्र्याच्या ७६ वर्षानंतर पहिल्यांदाच धावत आहे. त्या बसचं उद्घाटन आज झालं. पेनगुंडाला नवीन आऊटपोस्ट सुरु केलं असून कोनसरीमध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं,यामुळं गडचिरोलीला स्टील सिटीचा दर्जा मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद हा जवळजवळ संपुष्टात आणण्याचं काम सुरु केलं आहे. उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाली आहे. दक्षिण गडचिरोली माओवादापासून लवकरच मुक्त होईल याबाबत मनात शंका नाही.

कोण आहे माओवादी तारक्का?

तारक्काचे मूळ नाव विमला सीडाम असून त्या दडकरण्या झोनल समितीची सदस्या आहे. तिच्यावर १७० पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. चार राज्यात मिळून एक कोटी पेक्षा जास्तीच बक्षीस आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या माओवादी चळवळीत दाखल करण्यात तारक्काने सगळ्यात मोठी महत्वाची भूमिका बजावली आहे.

ताराक्कासोबत सुरेश बैसाखी उईके उर्फ चैतू उर्फ बुटी, कल्पना गणपती तोरेम उर्फ भारती उर्फ तोरेम, अर्जुन तानू हिचामी उर्फ सागर उर्फ सुरेश, संम्मी पांडू मट्टामी उर्फ बंडामी, निशा बोडका हेडो उर्फ शांती, श्रृती उलगे हेडो उर्फ मन्ना, शशिकला पथ्थीराम उर्फ श्रृती, सोनी सुक्कू मट्टामी आणि आकाश सोमा पुंग्गाटी उर्फ वत्ते यांनी आत्मसमर्पण केलं आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर