Gadchiroli News: गडचिरोलीतील वैनगंगा नदीत पोहायला गेलेल्या चार शाळेकरी मुले पाण्यात बुडल्याची घटना घडली. या घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तर, तिघांना वाचविण्यात यश आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
जयंत आझाद शेख (वय, १०) असे मृत मुलाचे नाव आहे. तर, रियाज शब्बीर शेख (वय, १४), जिशान फय्याज शेख (वय, १५) आणि लड्डू फय्याज शेख (वय, १३) या तिघांचे प्राण वाचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व जण आज दुपारी शहरापासून चार किलोमीटर अंतरावरील वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटावर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी जिशान आणि लड्डू यांची आई ताजू शेख या देखील त्यांच्यासोबत होत्या. यानंतर सर्व मुले पाण्यात उतरली आणि सर्वजण पाण्यात बुडाली. परंतु, खोल पाण्याचा अंदाज न आल्याने सर्व जण बुडाली. मुलांनी आरडाओरड करताच ताजू शेख यांनी हिंमत करुन पाण्यात उडी घेतली आणि त्यांनी जिशान आणि लड्डू आपल्या दोन मुलांसह रियाज यांना पाण्यातून बाहेर काढले. पण जयंत शेख हा प्रवाहात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला.
ताजू शेख यांचा आवाज ऐकून काही मच्छिमार त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी जयंतला बाहेर काढले. यानंतर जयंतला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
संबंधित बातम्या