Gadchiroli: गडचिरोली हादरले! नक्षलवाद्यांनी माजी पंचायत समितीच्या सभापतीची निर्दयीपणे केली हत्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gadchiroli: गडचिरोली हादरले! नक्षलवाद्यांनी माजी पंचायत समितीच्या सभापतीची निर्दयीपणे केली हत्या

Gadchiroli: गडचिरोली हादरले! नक्षलवाद्यांनी माजी पंचायत समितीच्या सभापतीची निर्दयीपणे केली हत्या

Feb 02, 2025 11:49 AM IST

Gadchiroli Naxal Attack : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी एका माजी पंचायत समिती संभापतीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.

गडचिरोली हादरले! नक्षलवाद्यांनी माजी पंचायत समितीच्या सभापतीची निर्दयीपणे केली हत्या
गडचिरोली हादरले! नक्षलवाद्यांनी माजी पंचायत समितीच्या सभापतीची निर्दयीपणे केली हत्या

Gadchiroli Naxal Attack : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहेत. काही दिवसांपासून नक्षलवादी हे सामान्य नागरिकांना लक्ष्य करत आहेत. भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुकराम महागु मडावी (वय ४६) यांची शनिवारी रात्री त्यांनी निर्दयीपणे हत्या केली आहे. नक्षलवाद्यांनी त्यांना घरातून बाहेर फरफट आणले. तसेच त्यांची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

काय आहे घटना ?

सुकराम महागु मडावी हे भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती होते. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. शनिवारी रात्री नक्षलवादी हे मडावी यांच्या घरात घुसले. त्यांनी त्यांना फरफटत मैदानी भागात नेले. या ठिकाणी त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे गावात व जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नक्षलवाद्यांनी मृतदेहाजवळ पत्रक फेकले असून त्यात त्यांनी हत्या का केली याचे कारण दिले आहे. आज सकाळी मडावी यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे.

गडचिरोलीत नक्षलवादी सक्रिय

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलचळवळ हद्दपार करण्यासाठी प्रशासनाने या ठिकाणी सर्वाधिक लक्ष दिले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीचा प्रभाव कमी झाला होता. मात्र, गेल्या दिवसांपासून नक्षलवादी हे पुन्हा सक्रिय झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शहरात एका व्यक्तिची खबरी असल्याच्या संशयातून नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. त्यानंतर अनेक छोट्या मोठ्या कारवाया करण्यात आल्या होत्या. आता नक्षलवादी सक्रिय झाल्याने प्रशासनासमोर नक्षलवाद्यांचा प्रभाव रोखण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. माजी सभापतींच्या हत्येमुळे गावात दहशतीचं वातावरण आहे. या हत्येवर कुणी बोलण्यास धजावत नसून पोलिस तपासात अनेक अडचणी येत आहे. गडचिरोलीत विकासासाठी नवे प्रकल्प, गुंतवणूक, रोजगार निर्मिती केली जात असतांना भामरागडच्या पंचायत समितीच्या माजी सभापतीची अशी निर्घृण हत्या केल्याने नक्षल चळवळ कशी करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर