मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Price Hike : अवकाळी पावसाचा परिणाम, पालेभाज्यांसह फळांच्या किंमतीत मोठी वाढ, सामान्यांना झटका
Vegetables Price Hike
Vegetables Price Hike (HT_PRINT)

Price Hike : अवकाळी पावसाचा परिणाम, पालेभाज्यांसह फळांच्या किंमतीत मोठी वाढ, सामान्यांना झटका

19 March 2023, 17:56 ISTAtik Sikandar Shaikh

Vegetables Price Hike : अवकाळी पावसानं धुमाकूळ घातल्यानं राज्यात भाज्यांसह फळांचे दर वाढले आहे. त्यामुळं सामान्यांना मोठा झटका बसला आहे.

Vegetables Price Hike In Pune : मराठवाडा, विदर्भ, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं शेतीपिकांसह पालेभाज्या आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं आता त्याचा परिणाम शेतमालाच्या किंमतीतही पाहायला मिळाला आहे. पुण्यातील गुलटेकडी मार्केटमध्ये भाजीपाला आणि फळांच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आधीच महागाईनं त्रस्त असलेल्या सामान्यांना मोठा झटका बसला आहे. मटार, दोडका, कारली, हिरवी मिरची, घेवडा, मटार आणि कैरीच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पुण्यातील गुलटेकडी मार्केटमध्ये टोमॅटो, भेंडी, गवार, हिरवी मिरची, फ्लॉवर, कोबी, ढोबळी मिरची, भोपळा, मेथी, कांदा आणि बटाटा या भाज्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. तर शेपू, चाकवत, पुदिना आणि अंबाडीच्या दरात मोठी घट झाली आहे. अवकाळी पावसामुळं गेल्या आठवड्याभरापासून मार्केटमध्ये भाजीपाल्यांची आवक कमी झालेली आहे. चुका, राजगिरा आणि चवळईचे दर स्थिर असून कोथिंबीरच्या जुडीचे दर वाढले आहेत. त्यामुळं आता इंधन आणि गॅसच्या दरवाढीमुळं आधीच होरपळणाऱ्या सामान्यांना भाज्यांच्या महागाईमुळं मोठा दणका बसणार आहे.

भाज्यांसह फळांच्या किंमतीत मोठी वाढ...

अवकाळी पावसामुळं राज्यातील फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यामुळं आवक कमी झाल्यामुळं गुलटेकडी मार्केटमध्ये कलिंगड, खरबूज, पपई आणि संत्र्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. चिकू आणि डाळिंबाच्या किंमती स्थिर असून मोसंबी, पेरु, अननस आणि द्राक्षांच्या किंमती वाढण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळं आता या दरवाढीमुळं भाजीपाला आणि फळभाज्या खरेदी करण्यासाठी सामान्यांना आणखी खिशात हात घालावा लागणार आहे.