पुण्यात ट्रूथ अँड डेअर गेमच्या माध्यमातून १७ वर्षीय तरुणीवर तिघांचा बलात्कार! इन्स्टाग्राम मैत्रिणीमुळे झाला घात
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यात ट्रूथ अँड डेअर गेमच्या माध्यमातून १७ वर्षीय तरुणीवर तिघांचा बलात्कार! इन्स्टाग्राम मैत्रिणीमुळे झाला घात

पुण्यात ट्रूथ अँड डेअर गेमच्या माध्यमातून १७ वर्षीय तरुणीवर तिघांचा बलात्कार! इन्स्टाग्राम मैत्रिणीमुळे झाला घात

Published Jan 24, 2025 02:20 PM IST

Rape case in Pimpri Chinchwad: मुंबईच्या वसई येथे एका २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना ताजी असतांना आता पिंपरी चिंचवडच्या रावेत परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी दारू पिऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पुण्यात ट्रूथ अँड डेअर गेमच्या माध्यमातून १७ वर्षीय तरुणीवर तिघांचा बलात्कार! इन्स्टाग्राम मैत्रिणीमुळे झाला घात
पुण्यात ट्रूथ अँड डेअर गेमच्या माध्यमातून १७ वर्षीय तरुणीवर तिघांचा बलात्कार! इन्स्टाग्राम मैत्रिणीमुळे झाला घात

Rape case in Pimpri Chinchwad: पुण्यात पिंपरी चिंचवड येथील रावेत परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी दारू पिऊन बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी ट्रूथ अँड डेअर खेळत हा अत्याचार केला आहे. पीडितेवर अत्याचार सुरू असताना अचानक पीडितेच्या नातेवाईकांना फोन लागला, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

आयुष आनंद भोईटे, सुशील बालद्र ठाकूर आणि रीतिक संजय सिंग असे आरोपींची नावे आहेत. पीडितेची व आरोपी हे एकमेकांच्या थेट ओळखीचे नव्हते. पीडित मुलीची इन्स्टाग्रामवर एका रीलस्टार तरुणीशी ओळख झाली होती. ही गहटण घडली तेव्हा ती या तरुणीला भेटायला आली होती. यावेळी पीडित ही तिच्या रुमवर थांबली होती. रीलस्टार मैत्रीण ही तिच्या तीन मित्रांसमोर रावेत परिसरात एका पार्टीला गेले होते. तेथून ते दारू पिऊन आले होते. रीलस्टार मैत्रीनीने पीडित मुलीला फोन करत पार्टीला बोलावले. दरम्यान, आरोपी हे पीडित मुलीच्या पेईंग गेस्ट रूमवर गेले. व तिला ते पार्टीला घेऊन आले. यानंतर ते एकाचया फ्लॅटवर गेले. दारूच्या नशेत त्यांनी ट्रूथ अँड डेअर गेल खेळने सुरू केले. या खेळा दरम्यान, आरोपींनी रीलस्टार मैत्रिणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांनी पीडित मुलीवर फ्लॅटमधील स्वच्छतागृहात बलात्कार केला.

आरोपी पीडित मुलीवर अत्याचार करत असतांना तिच्या नातेवाईकांना फोन लागला. फोन सुरू असल्याचं पीडित मुलगी व आरोपींच्या लक्षात आले नाही. पीडिते मुलीच्या नातेवाईकांनी फोनवरून हा सगळा प्रकार ऐकला. याची माहिती त्यांनी तिच्या आईला दिली. मुलीवर अत्याचार झाल्याचं समजल्यानंतर पीडितेच्या आई वडिल हे पहाटे पिंपरी चिंचवडमध्ये आले. या प्रकरणी त्यांनी रावेत पोलीस तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी आयुष आनंद भोईटे, सुशील बालद्र ठाकूर व रीतिक संजय सिंग यांना ताब्यात घेतलं असून पीडित मुलीच्या रीलस्टार मैत्रिणीलाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पीडित मुलीला आरोपींची नावे व अत्याचार झालेले ठिकाण याची माहिती नव्हती. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर