इन्स्टाग्रामवरील फेक अकाऊंटच्या प्रेमात पडली तरुणी ! सत्य समोर आल्यावर उचललं टोकाचं पाऊल; मैत्रिणीवर गुन्हा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  इन्स्टाग्रामवरील फेक अकाऊंटच्या प्रेमात पडली तरुणी ! सत्य समोर आल्यावर उचललं टोकाचं पाऊल; मैत्रिणीवर गुन्हा

इन्स्टाग्रामवरील फेक अकाऊंटच्या प्रेमात पडली तरुणी ! सत्य समोर आल्यावर उचललं टोकाचं पाऊल; मैत्रिणीवर गुन्हा

Aug 01, 2024 11:18 AM IST

Satara Crime news : सातारा येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीने इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट तयार करून तिच्या दुसऱ्या मैत्रिणीशी प्रेमाचे नाटक करून तिची मस्करी केली, पण, हीच मस्करी मैत्रिणीच्या जिवावर बेतली आहे.

इन्स्टाग्रामवरील फेक अकाऊंटच्या प्रेमात पडली तरुणी ! सत्य समोर आल्यावर उचललं टोकाचं पाऊल; मैत्रिणीवर गुन्हा
इन्स्टाग्रामवरील फेक अकाऊंटच्या प्रेमात पडली तरुणी ! सत्य समोर आल्यावर उचललं टोकाचं पाऊल; मैत्रिणीवर गुन्हा

Satara Crime news : सोशल मीडियावरील चेष्टा मस्करी एका तरुणीच्या जिवावर बेतल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. एका तरुणीने इन्स्टाग्रामवर मुलाचे खोटे अकाऊंट तयार करून तिच्याच मैत्रिणीशी प्रेमाचे नाटक केले. मात्र, या तरुणीला  जेव्हा सत्य समजले  तेव्हा तिला धक्का बसला. या धक्क्यातून तिने टोकाचे पाऊल उचलतं स्वत:चं जीवन संपलं. या घटनेमुळे मुलीच्या कुटुंबीयांना देखील मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी मृत मुलीच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.

आजची तरुणाई सोशल मिडियाच्या आहारी गेली आहे. या व्यसनातून अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत आहे. साताऱ्यात देखील वरील घटनेमुळे खळबळ उडाली आहे. साताऱ्यातील कोरेगाव उत्तरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे साऱ्यांनाच चक्रावून टाकले आहे. वास्तवात नसलेल्या प्रियकरासाठी एका युवतीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्याच जीवाभावाच्या मैत्रिणीने तयार केलेल्या बनावट इन्स्टाग्राम अकाउंटवरच्या मुलाच्या प्रेमात ही युवती पडली होती.

मृत तरुणीच्या जवळची असलेली गायत्री भोईटे हिने मनीष पाटील नावाचे इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार केले. या अकाऊंटवरून तिने तिच्या मैत्रिणीशी चॅट करण्यास सुरूवात केली. दोघांनीही बोलायला सुरुवात केली. काही दिवसांतर मृत तरुणीचा फेक अकाऊंट असलेल्या तरूणावर जीव जडला. मैत्रिणीने तयार केलेल्या या फेक अकाऊंटच्या प्रेमात ही तरुणी आकंठ बुडाली. मात्र, बनावट अकाउंट तयार केलेल्या मैत्रिणी आपण यात फसल्याची जाणीव झाली. हे प्रकरण आपल्या अंगलट येऊ शकते, अशी भिती तिला वाटली. अखेर तिने या मुलाचा मृत्यूची बातमी प्रेमात वाहून घेतलेल्या मैत्रिणीला दिली. हा धक्का ही तरुणी पचवू शकली नाही. तीची मानसिक स्थिती बिघडली. तसेच त्यानंतर प्रियकर आता या जगात नसल्याच्या नैराश्यातून तिने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणाचा असा झाला उलगडा.

मृत मुलीची मैत्रीण गायत्री भोईटे हिने मनीष पाटील नावाचे अकाऊंट सुरू केले. या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिने तिच्याच मैत्रिणीशी बोलणे सुरू केले. गायत्रीची मैत्रीण तिने फेक अकाऊंट तयार केलेल्या मनीष नामक तरुणाच्या प्रेमात पडली. गायत्री हीच मनीष म्हणून तिच्या मैत्रिणीशी चॅट करत होती. दरम्यान, गायत्रीच्या मैत्रिणीने भेटण्याचा आग्रह धरला. यामुळे आता प्रकरण अंगाशी येईल या भीतीने तिने मनीषच्या मित्राचे दुसरे फेक अकाऊंट तयार केले. यावर तिने त्याच्याशी संपर्क साधल्यावर मनीषने आत्महत्या केल्याची माहिती गायत्रीने तिच्या मैत्रिणीला दिली. याचा मोठा धक्का बसल्याने गायत्रीच्या मैत्रिणीची मानसिक अवस्था बिकट झाली. तिच्या कुटुंबीयांनी तिला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने आत्महत्या केली.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. मृत तरुणीही सोशल मीडियावर कुणाशी तरी नेहमी संपर्कात असायची अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली. वाठारचे पोलिस निरीक्षक अविनाश माने यांनी सांगितले की, पीडित तरुणी मनीष पाटील नावाच्या संपर्कात अनेक महिन्यांपासून होती. व दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याचे मेसेज सापडले. तिच्या मैत्रिणीने मनीषच्या वाडिलांच्या ओळखीचे व्यक्ति म्हणून दुसरे फेक अकाऊंट तयार करून मनीषने आत्महत्या केल्याची माहिती मृत तरुणीला दिली. जेव्हा सायबर पोलिसानी दोन्ही इंस्टाग्रामला खात्यांची माहिती घेतली तेव्हा आयपी अॅड्रेस वरून हे दोन्ही खाती गायत्री भोईटे वापरत असल्याची माहीती पुढे आली.

पोलिसांनी तिला अटक केली असता, तिने मनीष पाटील नावाचे बनावट प्रोफाइल तयार करून तिच्या मृत मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली व तिच्याशी चॅटिंग सुरू केले. व याच मनीषच्या प्रेमात मृत तरुणी पडली. तिने मनीषला भेटण्याचा आग्रह केल्याने गायत्रीने शिवम नावाचे पुन्हा बनावट प्रोफाईल तयार केले आणि १० जून रोजी मनीषने आत्महत्या केल्याचे तिने तिच्या मैत्रिणीला सांगितले. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वाठार पोलिसांनी भोईटेला अटक केली आहे. तिला कोर्टात हजर केले, असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर