Pune HInjawadi Crime news : पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातील आयटी नगरी असलेल्या हिंजवडी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आल आहे. तीन मित्रांनी मिळून त्याच्या एका मित्राला कपडे काढायला भाग पाडून त्याच्या गुप्तांगावर बाम लावण्यास भाग पाडले. एवढेच नाही तर त्याचा व्हिडिओ देखील काढून व्हायरल केला. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना हिंजवडी येथील मारुंजी रोड येथे मंगळवारी घडली. या प्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस संजय कवडे (वय १९, रा. हिंजवडी. मूळ रा. धाराशिव), ललित प्रमोद भदाने (वय २१, रा. हिंजवडी. मूळ रा. धुळे), राम तुळशीराम गंभीरे (वय ३५, रा. हडपसर. मूळ रा. लातूर) अशी आरोपींची नवे आहे. या तिघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी २० वर्षीय पीडित तरुणाने हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पीडित तरुण हा आरोपी श्रेयस व ललित हे तिघे जण ताथवडे येथील एका शिक्षण संस्थेत शिकत आहेत. आरोपी श्रेयसने पीडित तरुणाला मारुंजी रोड येथील एका सोसायटी मधील त्याच्या फ्लॅटवर बोलाले होते. या वेळी राम गंभीरे याने पीडित तरुणाला सिगारेट हातात दिली. ती पीडित मुलाकडून खाली पडली. दरम्यान, पीडित तरुणाने ती सिगारेट उचलून ऍशट्रेवर ठेवली. यामुळे राम गंभीरे याला राग आला. त्याने पीडित तरुणाला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्याला कपडे काढण्यास सांगितले. त्याला झंडू बाम त्याच्या गुप्तांगावर लावण्यास सांगितले. यावेळी ललित याने या घटनेचा व्हिडिओ काढला. तसेच तो सोशल मीडियावर व्हायरल केला. यावेळी आरोपी राम गंभीरे याने पीडित तरुणाला धमकी देखील दिली. तसेच माझ्यावर ५३ गुन्हे दाखल असून माझे कुणी काही करू शकत नाही असे म्हणत त्याला मारण्याची धमकी देखील दिली.
पीडित मुलाने या प्रकरणी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी याची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पिंपरीचिंचवडचे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड म्हणाले, तक्रारदार व संशयित दोन मुले एकाच महाविद्यालयात शिकत आहे. तर गंभीरे हा त्यातील एकाचा नातेवाईक आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे.
संबंधित बातम्या