मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chandrakant Khaire : 'शिवसेनेचं धनुष्यबाण गोठवणं म्हणजे आमच्या छातीवर...', चंद्रकांत खैरे थेटच बोलले

Chandrakant Khaire : 'शिवसेनेचं धनुष्यबाण गोठवणं म्हणजे आमच्या छातीवर...', चंद्रकांत खैरे थेटच बोलले

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 07, 2022 03:01 PM IST

Chandrakant Khaire On SC Judgement : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं लागावा, यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरै यांनी बाप्पाला साकडं घातलं आहे.

Chandrakant Khaire On SC Judgement
Chandrakant Khaire On SC Judgement (HT)

Chandrakant Khaire On SC Judgement : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी पार पडली आहे. कोर्टानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेसह इतर सर्व याचिकांची सुनावणी येत्या २७ सप्टेंबरला घेण्याचं निश्चित केलं आहे. याशिवाय निवडणूक आयोगाच्या कारवाईवरही दोन्ही गटांना म्हणणं मांडण्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.

परंतु कोर्टाच्या आजच्या सुनावणीत शिंदे गटाच्या वकिलांनी शिवसेनेचं पक्षचिन्ह असलेलं धनुष्यबाण येत्या निवडणुकांमध्ये गोठवण्याची मागणी केली होती. त्यावर माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे चांगलेच संतापले आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेचं धनुष्यबाण गोठवणं म्हणजे आमच्या छातीवर बाण मारण्यासारखं आहे, जर पक्षाचं चिन्ह गोठवलं गेलं तर शिवसैनिक आणखी आक्रमक होतील, असा इशारा खैरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला आहे.

ज्या लोकांना शिवसेनेनं मोठं केलं, जे लोक पक्षाच्या जिवावर नगरसेवक, आमदार आणि मंत्री केलं, तेच लोकं आता शिवसेनेला विसरले आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या मागे लागल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

परवानगी मिळो किंवा नाही, मेळावा आम्हीच घेणार- खैरे

सध्या शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यावरून राजकीय संघर्ष पेटला आहे. त्यावर बोलताना खैरे म्हणाले की, आम्हाला परवानगी मिळाली अथवा नाही मिळाली तरीदेखील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आम्हीच घेणार आहोत, इतर कुणीही मैदान गोठवण्याचा प्रयत्न करू नये. असं कुणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या अंगलट येईल, असा इशारा त्यांनी शिंदे गटाला दिला आहे.

निकाल ठाकरेंच्या बाजूनं लागावा, यासाठी खैरेंचं बाप्पाला साकडं...

शिवसेनेत बंड झाल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष हा सुप्रीम कोर्टात पोहचला होता. अनेक सुनावण्या झाल्यानंतरही कोर्टानं अद्याप अंतिम निकाल सुनावलेला नाही. त्यामुळं हा निकाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या बाजूनं लागावा, यासाठी बाप्पाकडे प्रार्थना केली असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं आहे.

IPL_Entry_Point