मोठी बातमी..! जूनपासून इंजिनिअरिंग, मेडिकलसह ६०० अभ्यासक्रम मुलींसाठी मोफत-free education for girls in 600 courses including engineering medical from june announcement by chandrakant patil ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मोठी बातमी..! जूनपासून इंजिनिअरिंग, मेडिकलसह ६०० अभ्यासक्रम मुलींसाठी मोफत

मोठी बातमी..! जूनपासून इंजिनिअरिंग, मेडिकलसह ६०० अभ्यासक्रम मुलींसाठी मोफत

Feb 09, 2024 10:23 PM IST

Free Education For Girl : इंजिनिअरिंग, मेडिकलसह ६०० अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत मिळणार आहे.ज्या मुलींच्या पालकांचेवार्षिक उत्पन्नआठ लाखांपेक्षा कमीआहे, अशा विद्यार्थिनींना याचा लाभ मिळणार आहे.

Free Education For Girl
Free Education For Girl

राज्यातील मुलींसाठी खुशखबर असून इंजिनिअरिंग, मेडिकलसह ६०० अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत मिळणार आहे. ज्या मुलींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थिनींना याचा लाभ मिळणार आहे. यंदाच्या जून महिन्यापासून याची अंलबजावणी सुरू केली जाणार आहे. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी ही घोषणा केली आहे.

जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विविध नवीन इमारतींच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली. म्हटले की, मुलींना मेडिकल, इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या तब्बल ६०० हून अधिक अभ्यासक्रमांना मोफत शिक्षण दिले जाईल.

इंजिनिअरिंग, मेडिकल सारख्या अभ्यासक्रमांना लाखो रुपये खर्च होतात. यामुळे सामान्य  कुटूंबातील मुले उच्च व तंत्र शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यात या योजनेमुळे मुलींसाठी उच्च  शिक्षणाची दारे उघडणार आहेत. 

८ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच, आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची १०० टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येणार आहे. यंदाच्या शैक्षणिक  वर्षात अधिकाधिक मुलींचे प्रवेश होतील, यासाठी विशेष अभियान राबवण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

या कार्यक्रमानंतर मुलांमध्ये नाराजी पसरली. मंत्री चंद्रकांत पाटील व्यासपीठावरून बाहेर पडत असताना तरुणांनी त्यांना अडवत केवळ मुलींना सवलत देण्यात आली तसेच कमी उत्पन्न गटातील मुलांनाही मोफत शिक्षणाची तरतूद करण्याची मागणी केली आहे. यावर तुमची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन पाटील यांनी केली.