मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  तुम्हालाही एखाद्या गुन्ह्यात अडकल्याचा फोन आलाय? मग वेळीच सावध व्हा! आयुष्यभराची कमाई झटक्यात गमवाल

तुम्हालाही एखाद्या गुन्ह्यात अडकल्याचा फोन आलाय? मग वेळीच सावध व्हा! आयुष्यभराची कमाई झटक्यात गमवाल

Jul 07, 2024 12:14 PM IST

Mumbai Frauds: सायबर गुन्हेगार आता नागरिकांना आपल्या जाळ्यात फसवण्यासाठी नवीन शक्कल लढवताना दिसत आहे.

तोतया मुंबई गुन्हे शाखेचा अधिकाऱ्याकने महिलेला ८० लाखांना लुटलं
तोतया मुंबई गुन्हे शाखेचा अधिकाऱ्याकने महिलेला ८० लाखांना लुटलं

Man Dupes Woman of 80 Lakh: चंदीगड सेक्टर ११ मधील एका महिलेला मुंबईतील गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवून सायबर गुन्हेगाराने तब्बल ८० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने पोलिसांना सांगितले की, १ जुलै २०२४ रोजी तिला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्याने स्वत:ला मुंबईतील गुन्हे शाखेतील अधिकारी असल्याचे सांगून आधार कार्डविरोधात जारी केलेला मोबाइल क्रमांकविरोधात तब्बल २४ मनी लाँड्रिंगच्या प्रकरणांची नोंद असल्याचे सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने संबंधित महिलेला या प्रकरणांची सुनावणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फोन करणाऱ्याने तिला एका खोलीत एकांत राहण्याची आणि कोणाशीही चर्चा न करण्याची सूचना केली. त्यानंतर त्याने तिला स्काइप डाऊनलोड करण्यास सांगितले, ज्याद्वारे त्याने तिला गंभीर कायदेशीर अडचणीची खात्री पटवून दिली. तात्काळ अटक टाळण्यासाठी तिला 'सिक्रेट सर्व्हेलन्स अकाऊंट'मध्ये ८० लाख रुपये जमा करावे लागतील, सविस्तर चौकशीनंतर ती निर्दोष आढळल्यास सर्व पैसे परत केले जातील, असे आश्वासन फोन करणाऱ्याने तिला दिले.

ट्रेंडिंग न्यूज

प्रचंड दबाव आणि अटकेच्या भीतीने महिलेने सांगितले की, तिने आपल्या मुदत ठेवी (एफडी) काढून टाकल्या आणि फोन करणाऱ्याने दिलेल्या बँक खात्यात रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) द्वारे ८०,३१,७६४ रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर काही दिवसांनी तिला आरोपीचा मेसेज आला, ज्यात तिचा ठावठिकाणा आणि तिच्या संवादाविषयी विचारणा करण्यात आली. या असामान्य पाठपुराव्यामुळे तिला काहीतरी गडबड झाल्याचा संशय आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने चंदीगडच्या सायबर क्राईम पोलीस ठाण्यात याची माहिती दिली.

तिच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१९ (२), ३१८ (४), ३३८, ३३६ (३), ३४० (२), ६१ (२), १११ (१) आणि १११ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपसाला सुरुवात केली. तसेच गुन्हेगारांचा शोध घेऊन चोरलेला निधी वसूल करण्याचे काम पोलिस करीत आहेत. याशिवाय, नागरिकांनी अशा कोणत्या भुलथापांना बळी पडू नये असे, आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. 

WhatsApp channel
विभाग