मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vedanta: फॉक्सकॉन-वेदांताबाबत उदय सामंत यांचा मोठा खुलासा, म्हणाले ‘हे’ २०२० मध्येच स्पष्ट झाले होते

Vedanta: फॉक्सकॉन-वेदांताबाबत उदय सामंत यांचा मोठा खुलासा, म्हणाले ‘हे’ २०२० मध्येच स्पष्ट झाले होते

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 14, 2022 04:56 PM IST

वेदांता-फॉक्सकॉन ही कंपनी महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याच्या कारणावरून महाराष्ट्रातील राजकारण कमालीचे तापलं आहे. आता शिंदे गटाचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वेदांतावरून मोठा खुलासा केला आहे.

फॉक्सकॉन-वेदांताबाबत उदय सामंत यांचामोठाखुलासा
फॉक्सकॉन-वेदांताबाबत उदय सामंत यांचामोठाखुलासा

मुंबई–महाराष्ट्रातील राजकारण सध्यावेदांता-फॉक्सकॉन ही कंपनी महाराष्ट्रातून गुजरात गेल्याच्या कारणावरून कमालीचे तापलं आहे. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांसह राज ठाकरे यांनीही शिंदे सरकारवर निशाणा साधला होता. वेदांतावरून राज्यात आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरू आहे. दरम्यान शिंदे गटाचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वेदांतावरून मोठा खुलासा केला आहे. वेदांता-फॉक्सकॉन कंपनीबद्दल महाविकास आघाडीने ६ महिन्यात केवळ बैठका घेतल्या करार काहीच झाले नव्हते. जानेवारी २०२० मध्ये स्पष्ट झाले होते की, ही कंपनी महाराष्ट्रात येणार आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वेदांता-फॉक्सकॉन कंपनी गुजरातला हलवण्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतरभाजपवशिंदे गटाकडूनयालाजोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.आताउद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे.

उदय सामंत म्हणाले की,फॉक्सकॉनबाबत सध्या आरोप केले जात आहेत. त्याला उत्तर म्हणून नाही तरमहत्वाची माहितीजनतेला देण्याच्या उद्देश्याने हीपत्रकार परिषद घेतली आहे. वस्तूस्थिती जनतेलाही कळली पाहिजे.ही कंपनी २ महिन्यातगुजरातला गेली नाही, तर मागील १ वर्षात याबाबत घडामोडी घडल्या आहेत. यासाठी पॅकेज दिल्याचे आरोप केले जात आहेत. याच्या माध्यमातूनविरोधकराजकारण करत आहे. ७ जानेवारी २०२०मध्येचतत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले होते की, फॉक्सकॉन कंपनी राज्यात येणार नाही,असा दावा सामंत यांनी केला.

सामंत म्हणाले की,चार राज्येया प्रकल्पासाठीआग्रही होते. ३९ हजार कोटीचे पॅकेज मविआने दिले होते, असं बोललं गेलं होतं ते कुठेही दिले गेले नाही. जागा निश्चित करायची होती.वीज कमी दराने पाहिजे होती. ९९ वर्षाच्या करारावर जागा पाहिजे होती पण ६ महिन्यात फक्त बैठका घेतल्या

गेल्या ही कंपनी येणार नाही, हे जानेवारी२०२०मध्ये स्पष्ट झाले होते,असा खुलासा सामंत यांनी केला.

 

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून अचानक गुजरातला नेण्यात आल्यानं आता राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र हा प्रकल्प गुजरातला गेल्याचं खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडलं आहे. वेदांता प्रकल्पावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांसह केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राज्याला सिरियस मुख्यमंत्र्यांची गरज आहे. तसंच मोदी सरकार महाराष्ट्राविरोधात कट करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या