Satara crime : राज्यात मुलींवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाहीत. रोज अशा घटना उघडकीस येत आहेत. बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना ताजी असतांना सातारा येथे एका ४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघकडकिस आली आहे. एका अल्पवयीन मुलाने एका चार वर्षांच्या मुलीला सूर्य दाखवतो, खाऊ देतो असे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळे मुलीचे कुटुंबीय हादरले आहेत. त्यांनी आरोपीविरोधात तक्रार दिली असून याप्रकरणी शिरवळ पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शिरवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. पीडित मूलजीआय ही येथील एका गावात तिच्या कुटुंबा सोबत राहते. तिचे वय ४ वर्षे ११ महीने आहे. मुलगी कुटुंबीयांसमवेत राहते. तिच्या घरा शेजारी आरोपी राहतो. त्याचे वय १३ वर्षे ५ महीने आहे. हा पुलगा पीडित मुलीच्या घरी खेळण्यासाठी आला होता. दोघेही खेळत असतांना त्याने मुलीला तुला सूर्य दाखवतो, खाऊ देतो असे म्हणत छतावर नेले. या दोघांच्या मागे आणखी एक अल्पवयीन मुलगा आला.
त्या मुलाला आरोपी मुलाने पाच रुपये देत खाऊ आणयला सांगितले. मुलगा खाऊ आणण्यासाठी दुकानात गेला असता, आरोपी मुलाने पीडित मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला त्रास होऊ लागल्याने ती ओरडली. यावेळी मुलाने तिला गाडीचे हुक लागले असे सांग म्हणत तेथून पळ काढला. मी तुला आणखी खाऊ देईल असे देखील त्याने सांगितले.
यानंतर तो पळून गेला. दरम्यान, रात्रीच्या सुमारास मुलगी झोपल्यावर तिला त्रास होऊ लागला. यावेळी तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचं तिच्या कुटुंबीयांना लक्षात आले. त्यांनी तिला दवाखान्यात नेले. तसेच मुलीच्या आईने थेट पोलिस गाठत आरोपी विरोधात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नयना कामठे करीत आहेत.