Pune khed taluka crime news : पुणे जिल्ह्यात आता पर्यंत मुली असुरक्षित असल्याचं चित्र होतं. मात्र, आता लहान मुलेसुद्धा वासनांध व्यक्तिपासून सुरक्षित नसल्याचं उघड झालं आहे. खेड तालुक्यातील एका गावात ४ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावात संतापाचे वातावरण आहे. नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
विजय ताठोड (वय २४) असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. खेड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना राजगुरुनगर येथे घडली आहे. एक लहान मुलगा हा त्याच्या घराजवळ खेळत होता. यावेळी आरोपी राठोड याने मुलाला खाऊचे आमिष दाखवून घरात नेले. मुलगा हा घरात जताच त्याच्यावर अमानुष पणे अनैसर्गिक अत्याचार केले. या घटनेबाबत कुणाला काही सांगितल्यास त्याला मारण्याची देखील धमकी आरोपीने दिली.
पीडित मुलगा हा घरी गेल्यावर त्याला त्रास होऊ लागल्याने त्याची विचारपूस आई वडिलांनी केली. यावेळी त्याने घराशेजारील विजय राठोडने त्याच्या सोबत केलेल्या कृत्याची माहिती दिली. या घटनेमुळे घरच्यांचा संताप झाला. त्यांनी तातडीने या प्रकरणी राजगुरुंगर पोलिस ठाणे गाठत आरोपी विरोधात तक्रार दिली.
पोलिसांनी देखील या प्रकरणाची तातडीने दखल घेत आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लहान मुलावर झालेल्या अत्याचार प्रकरणी स्थानीक नागरिकांनी रोष व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.