दिवाळीच्या आदल्या दिवशी माढ्यात वाईट घडलं! ४ ऊसतोड कामगार सीना नदीत बुडाले! शोधकार्य सुरू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दिवाळीच्या आदल्या दिवशी माढ्यात वाईट घडलं! ४ ऊसतोड कामगार सीना नदीत बुडाले! शोधकार्य सुरू

दिवाळीच्या आदल्या दिवशी माढ्यात वाईट घडलं! ४ ऊसतोड कामगार सीना नदीत बुडाले! शोधकार्य सुरू

Nov 01, 2024 10:35 AM IST

four sugarcane workers drowned in sina river : माढा तालुक्यातील खैराव येथे सीना नदी पात्रात चार उसतोड मजूर बुडाले आहे.

दिवाळीच्या आदल्यादिवशी माढ्यात वाईट घडलं! ४ ऊसतोड मजूर सीना नदीत बुडाले; शोध कार्य सुरू
दिवाळीच्या आदल्यादिवशी माढ्यात वाईट घडलं! ४ ऊसतोड मजूर सीना नदीत बुडाले; शोध कार्य सुरू

four sugarcane workers drowned in sina river : राज्यात मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी केली जात आहे. या दिवाळ सणात सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे एक मनहेलवणारी घटना उघडकीस आली आहे. खैराव येथे सीना नदीमध्ये ४ ऊसतोड मजूर बुडाले असून या घटनेमुळे गावात हलहळ व्यक्त केली जात आहे.

शंकर विनोद शिवणकर (वय २५), प्रकाश धाबेकर (वय २६), अजय महादेव मंगाम (वय २५), राजीव रामभाऊ गेडाम (वय २६, सर्व राहणार यवतमाळ) अशी बुडालेल्या मजुरांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार खैराव येथे नुकतेच उसतोड मजूर दाखल झाले आहेत. हे सर्व जण सीना नदीच्या किनाऱ्यावर थांबले होते. यावेळी एका उस तोड कुटुंबातील चौघे हे सीना नदी किनारी अंघोळीसाठी गेले होते. तर काही जण हे नदी किनारी कपडे धुण्यासाठी गेले होते. मात्र, यातील काही जणांना नदीतील पाण्याचा अंदाज आला नाही. यामुळे शिवणकर हा बुडायला लागला. यामुळे त्याला वाचवण्यासाठी इतर तिघे जण धावून गेले. प्रकाश, अजय यांनी नदीत उडी मारली. ते शंकरला वाचवण्याच्या प्रयत्नात असतांना ते दोघेही पाण्यात बुडाले. हे पाहून आणखी दोघांनी त्या तिघांना वाचवण्यासाठी नदीत उडी मारली. मात्र, पाण्याचा प्रवाहाचा वेग जास्त असल्याने चौघेही जण वाहून गेले.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल असून चौघांचा शोध सुरू आहे. गुरुवारी संध्याकाळ झाली तरी कुणाचाही पत्ता लागला नव्हता. त्यामुळे आज सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हलहळ व्यक्त केली जात आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर