कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात टेम्पो आणि ट्रकच्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील ४ मजुरांचा मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यातल्या बाल्की तालुक्यातील सेवानगर लमाणी तांडा येथे हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मजुरांना आंध्रप्रदेशला घेऊन जाणाऱ्या टेम्पोला बिदर जिल्ह्यात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकने समोरून जोरदार धडक दिली. यामध्ये टेम्पो चालकासह चार मजुरांचा जागीर मृत्यू झाला तर ५ जण गंभीर जखमी आहे. ही अपघात बुधवारी पहाटेच्या सुमारास झाला.
बिदर पोलिसांनी सांगितले की, महाराष्ट्रातील मजूर पुरवठा करणारा ठेकेदार राज्यातील कामगार हैदराबादला नेत होता. त्यामध्ये ३ लहान मुलांचा समावेश होता. या कामगारांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक मारली. हा अपघात बिदर जिल्ह्यातील बाल्की तालुक्यातील सेवानगर लमाणी तांडा (लमाणांची शहर वस्ती) येथे झाला. हा अपघात पहाटे साडे चार वाचण्याच्या सुमारास झाला. टेम्पोमधून १४ जण प्रवास करत होते. त्यातील ९ जखमींपैकी चार जणांचा सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. अन्य ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
बिदर पोलीस अधीक्षक चन्नबसव लंगोटी यांनी सांगितले की, जखमींवर बिदर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दस्तगीर डावलसाब ( ३६,) रशिदा शेख (४१) वली ३१, चालक) आणि अमन शेख (५१). दाणूर पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या