नवीन वर्षानिमित्त देवदर्शनाला जाताना भाविकांवर काळाचा घाला; अक्कलकोटमध्ये भीषण अपघातात ४ जण ठार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नवीन वर्षानिमित्त देवदर्शनाला जाताना भाविकांवर काळाचा घाला; अक्कलकोटमध्ये भीषण अपघातात ४ जण ठार

नवीन वर्षानिमित्त देवदर्शनाला जाताना भाविकांवर काळाचा घाला; अक्कलकोटमध्ये भीषण अपघातात ४ जण ठार

Jan 01, 2025 01:43 PM IST

Akkalkot Accident : नवीन वर्षानिमित्त देवाचे दर्शन घेण्यासाठी जात असताना भाविकांवर काळाने घाला घातला आहे. गाणगापूरला जात असताना झालेल्या अपघात चौघांचा मृत्यू झाला आहे.

नवीन वर्षानिमित्त देव दर्शनाला जातांना भाविकांवर काळाचा घाला; अक्कलकोटमध्ये झालेल्या भीषण अपघातात ४ जण ठार
नवीन वर्षानिमित्त देव दर्शनाला जातांना भाविकांवर काळाचा घाला; अक्कलकोटमध्ये झालेल्या भीषण अपघातात ४ जण ठार

Akkalkot Accident : देशभारात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. अनेकांनी पर्यटन स्थळी तर काही जणांनी धार्मिक स्थळी जात देवदर्शन घेत नवीनवर्ष साजरे केले. नवीन वर्षानिमित्त देव दर्शनासाठी अक्कलकोट येथे गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. मैंदर्गी जवळ दोन वाहनांची समोरा समोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार अक्कलकोट श्री स्वामी समर्थ दर्शन घेऊन गणगापूरला जातं असताना मैंदर्गी जवळ हा भीषण अपघात झाला आहे. भाविकांच्या गाडीला एका दुसऱ्या वाहनाने समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत चौघे जण जागीच ठार झाले आहे. तर ७ ते ८ जण जखमी झाले आहेत. मृत व जखमी भाविक हे स नांदेड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातस्थळी अक्कलकोट पोलीस दाखल झाले आहे. त्यांनी जखमीना तातडीने अक्कलकोट सार्वजनिक रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

नांदेड येथून भविकांचा एक गट हा अक्कलकोट आणि त्यानंतर गाणगापूरला दर्शनासाठी जात होता. नवीनवर्ष देव दर्शनाने हे सर्व जण साजरे करण्यात होते. मात्र, त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व जण आधी अक्कलकोट येथे पोहोचले. या ठिकाणी त्यांनी दर्शन घेतले. यानंतर सर्व जण पुढच्या प्रवासासाठी गाणगापूरला निघाले होते. त्यांचे वाहन हे मैंदर्गी जवळ आले असता, समोरून येणाऱ्या एका भरधाव वाहनाने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक भीषण होती की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. या घटनेत दोन महिला व दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेल्यांची व जखमी प्रवाशांची नावे समजू शकली नाही. या घटनेमुळे या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी नागरिकांना जवळच्या दवाखान्यात दाखल केले. तर मृतदेह देखील जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले.

अपघातग्रस्त वाहने बाजूला करून येथील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा अपघात झाल्याने सर्वत्र हलहळ व्यक्त केली जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर