Palghar Blast : पालघरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या ठिकाणी एका फ्लॅटमध्ये अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटात एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार परफ्युमच्या बाटल्यांवरील एक्सपायरी डेट बदलत असताना हा स्फोट झाला आहे. या घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
महावीर वडर (वय ४१), सुनीता वडर (वय ३८), कुमार हर्षवर्धन वडर (वय ९) आणि कुमारी हर्षदा वडर (वय १४) अशी या सपोटात जखमी झालेल्या चौघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, या फ्लॅटमध्ये परफ्यूमच्या बाटल्यांवरील एक्सपायरी डेट बदलण्यात येत होती. या दरम्यान हा स्फोट झाला. परफ्यूमच्या बाटल्यांमध्ये ज्वलनशील पदार्थ असतात. त्यामुळे हा स्फोट झाल्याचे बोललं जात आहे. जखमी कुमार हर्षवर्धन यांच्यावर नाला सोपारा येथील लाईफ केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर इतर तिघावर येथील ऑस्कर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पालघर येथील एका घरात परफ्यूमच्या बाटल्यांवरील एक्सपायरी डेट बदलण्याचं काम सुरू आहे. हे काम करत असतांना अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज आजूबाजूच्या घरांना मोठे हादरे बसले. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
एक्सपायरी डेट बदलताना बाटल्यांमधील रासायनिक अभिक्रियेमुळे हा स्फोट झाला असावा, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून अनेक आक्षेपार्ह साहित्य आणि उपकरणे जप्त केली आहेत. या उपकरणांचा वापर एक्सपायरी डेट बदलण्यासाठी केला जात होता. या बेकायदेशीर कृत्यामागचा मुख्य हेतू काय होता, हे स्पष्ट झालेले नाही.
संबंधित बातम्या