ठाण्यातील मुंब्रा येथील प्लस चार मजली इमारतीचा दुसऱ्या मजल्यावरील काँक्रीटचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या घटनेत चार जण जखमी झाले आहेत. ठाणे महानगरपालिकेने याबाबत माहिती दिली. आरडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी दुपारी मुंब्रा येथे ही घटना घडली, तेव्हा खोली क्रमांक १०१ आणि २०१ मधील रहिवासी त्यांच्या खोलीत होते.
आरडीएमसीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, १६ वर्षे जुनी सदफ अपार्टमेंट ही ग्राउंड प्लस चार मजली इमारत असून तळमजल्यावर एकूण ३० खोल्या आणि दोन दुकाने आहेत. सलमा मिर्झा (वय, ३८), सालेहा अन्सारी (वय, २३), नोमान अन्सारी (वय, १२) आणि रुबीना शेख (वय, २२) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्या डोक्याला, कंबरेला आणि पायाला जखम झाली. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्रादेशिक डिस्टेटर मॅनेजमेंट सेलचे प्रमुख यासीन तडवी यांनी सांगितले की, स्लॅब कोसळल्याची माहिती आम्हाला शुक्रवारी दुपारी २.२० च्या सुमारास मिळाली. आम्ही घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या दोन खोल्यांमधील कुटुंबियांना बाहेर काढून १०१ व २०१ क्रमांकाच्या खोल्या सील केल्या असून तेथील रहिवाशांना त्यांच्या नातेवाइकांकडे निवाऱ्यासाठी स्थलांतरित करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या