Four Indian students From Jalgaon drown in Russia : जळगाव जिल्ह्यातील काही विद्यार्थी रशियात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेले होते. त्यांच्या सोबत एक दुर्दैवी घटना घडली आहे. हे रशियातील वोल्खोव्ह नदीच्या किनारी फिरत असतांना एक मोठी लाट आल्याने चौघे जण नदीत बुडाले. यातील तिघांचा मृत्यू झाला तर एकाला वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश आले आहे. हे सर्व विद्यार्थी यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होते.
रशियातील सेंट पीटर्सबर्गजवळ वोल्खोव्ह नदीत बुडून चार भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. हे सर्व विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातील आहेत. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला असून तिन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह लवकरात लवकर भारतात आणून टे नातेवाईकांकडे पाठवले जाणार आहे. भारतीय दूतावास या साठी रशियन अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहेत.
हर्षल अनंतराव देसले (भडगाव), जिशान अश्पाक पिंजारी, जिया फिरोज पिंजारी (अमळनेर) अशी मृत विद्यार्थ्याची नावे आहेत. हे तिघेही रशियाच्या यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये घेत होते. हे तिघे व त्यांचे काही मित्र हे फावल्या वेळेत संध्याकाळी वोल्खोव्ह नदीच्या किनारी शहराच्या समुद्रकिनाऱ्याजवळ पहर्त होते. यावेळी एक मोठी लाट आली आणि त्यांना नदीत ओढले. यात तिघांचा मृत्यू झाला. तर एकाला वाचवण्यात यश आले आहे.
'लवकरात लवकर मृतदेह नातेवाईकांकडे पाठवण्याचे काम आम्ही करत आहोत. ज्या विद्यार्थ्याचा जीव वाचला आहे, त्या विद्यार्थ्यावरही योग्य उपचार केले जात आहेत,' अशी माहिती मॉस्कोतील भारतीय दूतावासाने दिली. सेंट पीटर्सबर्गयेथील भारतीय दूतावासाने सांगितले की, मृतदेह लवकरात लवकर नातेवाईकांकडे पाठवण्यासाठी वेलिकी नोव्हगोरोडच्या स्थानिक प्रशासनासोबत मिळून काम केले जात आहे. तर शोकाकुल कुटुंबियांशी संपर्क साधून सर्वतोपरी मदत केली जात आहे.
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी देखील रशियातील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आहे. भारतीय दुतावासाने संबंधित विद्यापीठाशी संपर्क करून माहिती घेतली असल्याचे त्यांनी सांगिततले असून लवकरच सर्व मृतदेह भारतात आणून कुटुंबीयांना दिले जाणार असल्याचे प्रसाद म्हणाले.