मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  देवदर्शनासाठी गेलेल्या मित्रांवर काळाचा घाला, गोदावरी नदीत बुडून चार जणांचा अंत
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

देवदर्शनासाठी गेलेल्या मित्रांवर काळाचा घाला, गोदावरी नदीत बुडून चार जणांचा अंत

11 March 2023, 20:47 ISTShrikant Ashok Londhe

पोहण्यासाठी गोदावरी नदीत गेलेल्या चार जणांचा मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर महामार्गावरील कायगाव टोका येथे असलेल्या गोदावरी नदीत ही घटना घडली आहे.

वैजापूर तालुक्यातील चार मित्र देवदर्शनासाठी कायगाव टोका येथे मोटारसायकलीने गेले होते. षष्टीनिमित्त देवदर्शनाला ते नेहमी जात असत. गोदावरी नदीत अंघोळीसाठी गेलेल्या चारही मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या पैकी दोन जणांचा मृत्यू सापडला असून इतरांचा शोध सुरू आहे. बाबासाहेब अशोक गोरे आणि शंकर पारसनाथ घोडके यांचे मृतदेह सापडले आहे. इतर दोघांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. कायगाव टोका येथे ही घटना घडली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

वैजापूर तालुक्यातील पालखेड गावातील चार तरुण मोटरसायकलीवरून मढी येथे यात्रेसाठी चाललेले होते. जाताना हे सर्वजण प्रवरासंगम येथील सिद्धेश्वर महादेव मंदिराजवळ नदीत  अंघोळीसाठी उतरले. गोदावरी नदीतील खड्यांचा अंदाज न आल्याने चारजण पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक मदतीसाठी धावले. पोलिसांनी दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे. 

वैजापूर तालुक्यातील हे चारही तरुण देवदर्शनासाठी गेले होते. षष्ठी निमित्त देवदर्शनाला जाण्याची परंपरा आहे. नदीपात्रात अंघोळ करून देवदर्शनासाठी जावे लागते. त्यामुळे चारही तरुण नदीत उतरले, पण पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आतापर्यंत दोघेजण सापडले असून दोन जणांचा शोध सुरू आहे.

विभाग