Boisar Train Derailed : मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरले, पालघरमधील बोईसर रेल्वे स्थानकाजवळील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Boisar Train Derailed : मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरले, पालघरमधील बोईसर रेल्वे स्थानकाजवळील घटना

Boisar Train Derailed : मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरले, पालघरमधील बोईसर रेल्वे स्थानकाजवळील घटना

Jul 27, 2024 03:26 PM IST

Palghar Goods Train Derailed: पालघरमधील बोईसर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवााने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बोईसर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे चार डबे घसरले
बोईसर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे चार डबे घसरले

Goods Train Derailed Near Boisar Railway Station : पालघरमधील बोईसर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरले. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे मुंबई लोकलच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही, त्या वेळत धावत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील बोईसर रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, यामुळे लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम झाला नाही, असे पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ म्हणाले. पालघरमधील बोईसर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरले. या घटनेची पाहणी करण्यासाठी रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.

याआधी पालघर रेल्वे स्थानकात मालगाडीचे ५ ते ६ डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, त्यावेळी मुंबईची लाइफलाईन असलेली लोकलसेवा ठप्प झाली होती. ही घटना २८ मे रोजी सव्वा पाच वाजताच्या सुमारास घडली. विरार ते डहाणू अप आणि डाऊन दोन्ही बाजूची लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली. लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. लांब पल्ल्यांच्या गाड्या १० ते १२ तास उशीराने धावत आहेत. या गाड्यांना पालघर ते विरारदरम्यान सर्व रेल्वे स्थानकांवर थांबा दिला जात होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर