pratibha tai patil admited in hospital pune : भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (वय ८९) यांची प्रकृती अचानक खराब झाल्यामुळे त्यांना पुण्यातील भारती रुग्णालयात बुधवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आले आहे. पाटील यांना अचानक छातीत इन्फेक्शन आणि ताप आल्यामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासाने दिली आहे.
राष्ट्रपती प्रतिभा पाटील या निवृत्त झाल्यावर त्यांना पुण्यात राहतात. बुधवारी रात्री त्यांना अचानक छातीत इन्फेक्शन झाले. तसेच त्यांना ताप देखील आला. यमुळे त्यांना पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. बुधवारी रात्री त्यांना दवाखान्यात काही वेळ अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती ही स्थिर आहे. तज्ञ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीव्र लक्ष ठेऊन आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
प्रतिभाताई पाटील यांचे वय ८९ वर्षे आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी आहेत. बुधवारी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. यमुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने पुण्यातील भरती विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रतिभा पाटील यांनी २००७ ते २०१२ या काळात देशाचे राष्ट्रपतीपद भूषवले. त्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या कार्यकाळात अनेक खाती देखील सांभाळली आहेत. प्रतिभा पाटील या राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात सदस्य म्हणून देखील निवडून गेल्या आहेत. त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा देखील राहिला आहेत.