Vanraj Andekar murder : पुणे हादरलं! राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळीबार व कोयत्याने वार करून हत्या-former ncp corporator vanraj andekar shot dead from a pistol in pune nana peth pune crime news ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vanraj Andekar murder : पुणे हादरलं! राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळीबार व कोयत्याने वार करून हत्या

Vanraj Andekar murder : पुणे हादरलं! राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळीबार व कोयत्याने वार करून हत्या

Sep 02, 2024 09:38 AM IST

Vanraj Andekar murder Pune : पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

पुणे हदारलं! राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू
पुणे हदारलं! राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू

Vanraj Andekar murder Pune : पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. खून, दरोडे, बलात्कार, टोळी युद्ध या सारख्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पुणे नगरी आता गुन्हेनगरी म्हणून ओळखू लागली आहे. पुण्यात रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास नाना पेठे येथे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर काही जणांनी पिस्तुलातून गोळीबार केला. यानंतर त्यांच्यावर कोयत्याने देखील हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना केईएम रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. पुण्याच्या मध्यवस्तीत गणेशोत्सवाच्या काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवकाची गोळीबार करून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

गणेश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड, तुषार आबा कदम, अशी संशयित आरोपींनी नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार वनराज आंदेकर रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात काही कामानिमित्त गेले होते. यावेळी हल्लेखोराने त्यांच्यावर पिस्तुलातून ५ ते ६ गोळ्या झाडल्या. या गोळीबारात आंदेकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिसर सील केला. ज्या ठिकाणी गोळीबार करण्यात आला त्या ठिकाणी पाच ते सहा राऊंड पोलिसांना सापडले. दरम्यान, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथकांची स्थपणा केली आहे. तसेच त्यांचा शोध घेण्यासाठी ती रवाना करण्यात आली आहे. वनराज यांच्यावर वैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या गोळीबारामागचे कारण समजू शकले नाही. वर्चस्व वादातून गोळीबार करण्यात आल्याची माहिती प्राथमिक पोलिसांनी दिली.

आरोपी दुचाकीवरून आले अन् गोळीबार करून गेले

हल्लेखोर हे एका दुचाकीवरुन आले होते. गाडीवर दोघे जण होते. त्यांनी वनराज आंदेकर यांच्यावर फायरिंग केली. तब्बल पाच राऊंड फायर केल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार देखील केले. यात आंदेकर हे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.

दवाखान्यासमोर समर्थकांची मोठी गर्दी

नाना पेठेत आंदेकर यांचा मोठा दबदबा आहे. त्यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी केईएम रुग्णालया बाहेर मोठी गर्दी केली होती. हल्लेखोरांनी हल्ला करण्यापूर्वी येथील लाइट घालवली होती. घरातील कार्यक्रम असल्यामुळे आंबेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते. नेमकी हीच संधी साधून दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार जणांनी त्यांची हत्या केली. आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक होते. शिवाय त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याचे बोलले जाते. मात्र घरगुती वादातून नातेवाईकाने हल्ला केल्याची माहिती आहे.

विभाग