मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sameer Wankhede: हिशेब तर द्यावाच लागेल; समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी

Sameer Wankhede: हिशेब तर द्यावाच लागेल; समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 19, 2022 12:57 PM IST

Sameer Wankhede death Threat: समीर वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानतंर दुसऱ्याच दिवशी त्यांना धमकी देण्यात आली आहे.

समीर वानखेडे
समीर वानखेडे (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Sameer Wankhede death Threat: मुंबईत कार्डेलिया क्रूझ प्रकरणानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. जे केलंय त्याचे परिणाम भोगावे लागतील असा मेसेज त्यांना पाठवण्यात आला आहे. विशेष म्हणजे नवाब मलिक यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर समीर वानखेडेंना धमकी मिळाली आहे. समीर वानखेडे यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसंच याची माहिती पोलिसांना सविस्तर दिली आहे. ट्विटरवर अमन नावाच्या युजरने धमकी दिली आहे.

समीर वानखेडे यांना ट्विटरवर टॅग करत आरोपीने धमकी दिली होती. त्या ट्विटला वानखेडे यांनी उत्तरही दिले, पण काही वेळातच आरोपीनं हे ट्विट डिलीट केलं. आता या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. समीर वानखेडे यांची एनसीबीमधून बदली झाल्यानंतर आता पुन्हा एकदा ते या धमकीमुळे चर्चेत आलेत.

एनसीबीचे विभागीय संचालक असताना ड्रग्ज प्रकरणी कार्डेलिया क्रूझवर केलेली कारवाई गाजली होती. अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन याला अटक करण्यात आली होती. मात्र काही संबंध नसताना आर्यन खानला जाणीवपूर्वक या प्रकरणात अडकवल्याचं समोर आलं होतं. यानंतर एनसीबीच्या कार्यशैलीवर आक्षेप घेतला गेला होता. शेवटी समीर वानखेडे यांना आयआरएसमध्ये जुन्या पोस्टिंगवर बदली मिळाली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडेंवर बनावट जात प्रमाणपत्र देवून सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी समीर वानखेडेंना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने क्लिनचीट दिली होती. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचं सिद्ध होत नसल्याचं समितीने म्हणत वानखेडेंचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले होते.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या