‘महाराष्ट्रातील सगळे भिकारी शिर्डीत गोळा झालेत, मोफत जेवण बंद करा’, साई भक्तांबाबत बोलताना माजी खासदाराची जीभ घसरली
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘महाराष्ट्रातील सगळे भिकारी शिर्डीत गोळा झालेत, मोफत जेवण बंद करा’, साई भक्तांबाबत बोलताना माजी खासदाराची जीभ घसरली

‘महाराष्ट्रातील सगळे भिकारी शिर्डीत गोळा झालेत, मोफत जेवण बंद करा’, साई भक्तांबाबत बोलताना माजी खासदाराची जीभ घसरली

Jan 06, 2025 07:29 PM IST

Sujay Vikhe On Sai Baba Sansthan : शिर्डीत भिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. मोफत जेवण बंद करावं आणि मुलांच्या भविष्यासाठी हा पैसा खर्च केला जावा,असे सुजय विखे म्हणाले.

साई भक्तांबाबत बोलताना माजी खासदाराची जीभ घसरली
साई भक्तांबाबत बोलताना माजी खासदाराची जीभ घसरली

शिर्डीतील साईबाबा संस्थानाकडून दररोज लाखो लोकांना अन्नछत्रामार्फत मोफत जेवण पुरवलं जातं मात्र हे मोफत जेवण बंद करावं. फुकट जेवणामुळे महाराष्ट्रातील भिकारी सगळे येथे गोळा झाले आहेत. त्यांच्याकडून पैसे घेऊन हे पैसे मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावे, अशी मागणी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली.‘संपूर्ण देश येथे येऊन फुकट जेवण करतोय,संपूर्ण महाराष्टातील भिकारी येथे गोळा झालेत’,असं विधानही सुजय विखे यांनी शिर्डीतील एका कार्यक्रमात केलं. या विधानावरून राजकारण तापलं आहे.

शिर्डीतील साईबाबा संस्थान भक्तांच्या देणगीतून दररोज ५० हजारापेक्षा जास्त लोकांना मोफत भोजन देत आहे. मात्र यामुळे शिर्डीत भिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. मोफत जेवण बंद करावं आणि मुलांच्या भविष्यासाठी हा पैसा खर्च केला जावा,असे सुजय विखे म्हणाले.

सुजय विखे म्हणाले की,साईं बाबांचे विचार संपूर्ण देशात पसरले आहेत. त्याचबरोबर आता शिर्डीच्याअर्थव्यवस्थेलाही गती देणे महत्वाचे आहे. आपल्याला भविष्य़ाच दोन कामे करायची आहेत. शिर्डी संस्थानने पैसे अशा गोष्टींवर खर्च करावेत, ज्यामुळे स्थानिक लोकांना उदरनिर्वाहाने साधन मिळेल. आम्ही रुग्णालये बनवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सध्या शिर्डीकरांना याची गरज नाही. आज शिर्डीवासीयांना आमची आवश्यकता आहे, आम्ही २९८ कोटी रुपये खर्चून संस्था सुरू केल्या आहेत. ११ वी १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठीकोचिंग सेंटर सुरू करण्याची आवश्यकता आहे. आम्ही रुग्णालये बनवली आहेत, मात्र याचा केवळ २५ टक्के स्थानिकांना फायदा होतो तर ७५ टक्के बाहेरचे लोक याचा लाभ उचलतात. यामुळे स्थानिक लोकांच्या जीवनात यामुळे काही बदल होतो ना त्यांना रोजगार मिळतो.

सुजय विखे म्हणालेस साई संस्थान भाविकांना मोफत भोजन उपलब्ध करते. मात्र यासाठी प्रतिव्यक्ती २५ रुपये घेतले जावेत. भोजनासाठी पैसे घेऊन शिल्लक राहिलेले पैसेमुला-मुलींच्या शिक्षणावर खर्च करावे. संपूर्ण देश येथे मोफत भोजन करण्यासाठी येतो, महाराष्ट्रातील भिकारी येथे जमा होत असतात.

सुजय विखे पाटील यांच्या या वक्तव्यावरून मोठी खळबळ उडाली असताना साई संस्थानचे माजी विश्वस्त एकनाथ गोंदकर म्हणाले, देणगीदार साई भक्तांनी३६५दिवस अन्नदानासाठी बुकिंग करून ठेवलं असून याचा आर्थिक बोजा साईबाबा संस्थानवर पडत नाही. साई संस्थानकडे साडेचारशे कोटीहून अधिक निधी अन्नदानासाठी पडून आहे. तो निधी साई संस्थांनला अन्य कुठेही वापरता येत नाही. महाप्रसाद म्हणून भाविक साई प्रसादालयात भोजन करत असतात.

सुजय विखेंचे स्पष्टीकरण -

सुजय विखेयांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण देत म्हणले की, कोणत्याही साई भक्ताचा अपमान करण्याचा उद्देश्य नव्हता.साईं भक्तांचा आम्ही आदर करतो. मात्र मी हे आकडे जाहीर करणार आहे की, पोलिसात नोंद असलेले किती गुन्हेगार भिकारी बनून आले. जेव्हा कधी मी संस्थानकडे एखादी समस्या घेऊन जातो तेव्हा ते म्हणतात की, आमच्य़ाकडे पैसे नाहीत. यामुळे माझे मत आहे की, महाप्रसादाचे १० रुपये घेऊन जी काही बचत होईल ती मुलीच्या शिक्षणावर खर्च करावी, आ मागणीवर मी ठाम आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर