मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vallabh Benke: जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे अल्पशा आजाराने निधन

Vallabh Benke: जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे अल्पशा आजाराने निधन

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 12, 2024 06:11 AM IST

Vallabh Benke Passes Away : जुन्नर तालुक्याचे आमदार तसेच शरद पावर यांचे खंदे समर्थक वल्लभशेठ बेनके यांचे रविवारी रात्री निधन झाले.

Vallabh Benke Passes Away
Vallabh Benke Passes Away

Vallabh Benke Passes Away : शरद पवार यांचे खंदे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष माजी आमदार वल्लभशेठ दत्तात्रय बेनके यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी रविवारी अल्पशा आजाराने रात्री १०.३०च्या सुमारास निधन झाले. अजित पवार गटातील आमदार अतुल बेनके यांचे ते वडील होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आमदार अतुल बेनके, डॉ. अमोल, अमित, दोन भाऊ, तीन बहिणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. तयांचे पार्थिव आज सोमवारी (दि १२) सकाळी ९ ते १२ या वेळेत नारायणगाव येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर ४ वाजता जुन्नरमधील हिवरे बुद्रुक येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी केला जाणार आहे. त्यांच्या जाण्याने जुन्नर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

ज्यांनी पक्ष उभारला, त्यांच्याच हातातून पक्ष काढून घेतला; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शरद पवार नाराज

अतुल शेठ बेनके हे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे कट्टर समर्थक होते. बेनके यानी जुन्नर विधानसभा मतदार संघातून १९८५ ते २००९ या कालावधीत सलग सहावेळा निवडणूक लढवली होती. त्यातील चार वेळा ते विजयी झाले होते. गेल्या चार ते वर्षांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. यामुळे त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत मुलगा अतुल बेनके याला पुढे केले होते.

आमदार वल्लभ शेठ बेनके यांचा जन्म २३ जून १९५० रोजी जुन्नर तालुक्यातिल हिवरे बुद्रुक येथे झाला. शेती हा त्यांचा मूळ व्यवसाय असून १९८५ साली ते जुन्नर विधानसभा मतदार संघातून विजयी झाले. त्यानंतर १९९० साली ते दुसऱ्यांदा आमदार झाले. दरम्यान, पुढील दोन निवडणुकीत त्यांच्या माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी सलग दोन वेळा पराभव केला. यानंतर २००४ आणि २००९ साली ते पुन्हा आमदार म्हणून निवडणून आले.

Bharat Ratna: भारतरत्न पुरस्कारांवरून उद्धव ठाकरे मोदींवर बरसले, कर्पुरी ठाकूरांचे नाव घेत म्हणाले

जुन्नर तालुका आणि पुणे जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाचं योगदान देणारं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या निधनामुळे शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी लढणारं, जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वल्लभशेठ बेनके हे १९८५ साली प्रथम जुन्नर विधानसभेवर निवडून आले होते, त्यानंतर १९९० मध्ये दुसऱ्यांदा ते आमदार झाले. वर्ष २००४ व २००९ मध्ये पुन्हा त्यांनी जुन्नर मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. परखड वक्तव्य व प्रशासनावर असलेली पकड यामुळे त्यांचा संपूर्ण पुणे जिल्ह्यात दरारा होता. कार्यकर्त्यांचा आधार असणाऱ्या वल्लभशेठ बेनके यांच्या निधनामुळे आमदार अतुल बेनके आणि त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आमदार अतुल बेनके आणि कुटुंबीयांच्या तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी आहे. स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

WhatsApp channel

विभाग