मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीत फडणवीसांच्या तोंडाला फेस आणणारा नागपूरमधील बडा नेता भाजपच्या गळाला-former mla ashish deshmukh will join bjp in presence of devendra fadnavis and nitin gadkari ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीत फडणवीसांच्या तोंडाला फेस आणणारा नागपूरमधील बडा नेता भाजपच्या गळाला

मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीत फडणवीसांच्या तोंडाला फेस आणणारा नागपूरमधील बडा नेता भाजपच्या गळाला

Jun 14, 2023 11:44 PM IST

Ashish Deshmukh will join bjp : काँग्रेसमधून ६ वर्षासाठी निलंबित केलेले आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. रविवारी १८ जून रोजी ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.

Ashish Deshmukh will join bjp
Ashish Deshmukh will join bjp

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर सर्वच पक्षांनी कंबर कसली असून भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झालं आहे. काँग्रेसमधून ६ वर्षासाठी निलंबित केलेले व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघातून देवेंद्र फडणवीसांच्या तोंडचं पाणी पळवणारे आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. १८ जून रोजीनितीन गडकरीव फडणवीसांच्या उपस्थितीत आशिष देशमुख भाजपचे कमळ हातात घेणार आहेत. या पक्षप्रवेशाच्या बॅनरचे फोटो समोर आले आहेत.

काटोलचे माजी आमदार आशिष देशमुख यांनीकाँग्रेस नेतृत्वावर सातत्याने टीका केल्याने काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने त्यांना ६ वर्षासाठी पक्षातून निलंबित केले आहे. काँग्रेसने निलंबित केल्यानंतर आशिष देशमुख कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याकडे साऱ्यांचे लक्ष होते. आता ते भाजपमध्ये जाणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आशिष देशमुख आगामी विधानसभा निवडणुकीत काटोल किंवा सावनेर मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.

 

पक्षप्रवेशाचे पोस्टर
पक्षप्रवेशाचे पोस्टर

काँग्रेसमधून निलंबित केल्यानंतर आशिष देशमुख चंद्रशेखर बावनकुळे व अन्य भाजप नेत्यांच्या संपर्कात होते. आता येत्या रविवारी आशिष देशमुख भाजपवासी होत आहेत.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत देशमुख हे नागपूरच्या नैवेद्यम नार्थस्टार, कोराडी येथे प्रवेश करणार आहे. आशिष देशमुख यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.