Ramesh Kuthe Quits BJP: गोंदियाचे माजी आमदार आणि भाजप (BJP) नेते रमेश कुथे (Ramesh Kuthe) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत (Shiv Sena UTB) प्रवेश केला. कुथे यांनी २०१८ मध्ये शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान जिव्हारी लागल्याने भाजप सोडण्याचा निर्णय घेतला, असे रमेश कुथे म्हणाले. तसेच भाजपने बेवकूफ बनवल्याचीही त्यांनी टीका केली.
रमेश कुथे यांनी १९९५ आणि १९९९ मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या तिकिटावर दोनदा विधानसभा निवडणूक जिंकली. यानंतर ते काही काळ राजकारणापासून दूर राहिले. दरम्यान, २०१८ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून ते भाजप नेत्यांवर नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती. त्यावेळी रमेश कुथे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर त्यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
रमेश कुथे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कार्यकर्त्यांनी गोंदिया विधानसभा मतदारसंघात फटाके फोडून आनंद व्यक्त केला. रमेश कुथे यांनी पक्षात प्रवेश केल्याने ठाकरे यांची गोंदियात आणखी ताकद वाढली आहे. शिवसेनेचे दोन वेळा आमदार राहिलेले रमेश कुथे अखेर घरी परतले आहेत. २०१९ मध्ये रमेश कुठे यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. आता सहा वर्षांनंतर गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजप सोडून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र, २००४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल यांच्याकडून पराभव झाला होता. दरम्यान, पक्षप्रवेश करताना उद्धव ठाकरे यांनी रमेश कुथे यांना एक प्रश्न विचारला. ‘मी तुमच्या हातावर शिवबंधन बांधतो, पण तुम्ही पुन्हा पक्ष सोडला तर…?’ असे ठाकरे म्हणाले. यावर रमेश कुथे हसत म्हणाले की, मी शिवसेनेतच होतो, फक्त अभ्यास करण्यासाठी तिकडे गेलो होतो.
माजी आमदार संतोष सांबरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा जालना मधील बदनापूर विधानसभा मतदार संघातील आरएसएस पदाधिकारी, भाजप नेते डॉ. सुरेशकुमार कासर, मुस्लिम समाजाचे अभ्यासक प्रा.डॉ. शफी शेख, बदनापूरचे सरपंच राजेंद्र भैय्या जैस्वाल, सुप्रसिद्ध वकील विष्णू मदन, भाजप पदाधिकारी रामेश्वर फंड, भाकरवाडीचे उपसरपंच आसिफ पटेल, राष्ट्रवादीचे युवा पदाधिकारी साजीद शब्बीर पटेल यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.
संबंधित बातम्या