लोकसभा निवडणूक संपताच भाजपला मोठा धक्का; महाराष्ट्रातील माजी केंद्रीय मंत्र्यांचा पक्षाला रामराम
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  लोकसभा निवडणूक संपताच भाजपला मोठा धक्का; महाराष्ट्रातील माजी केंद्रीय मंत्र्यांचा पक्षाला रामराम

लोकसभा निवडणूक संपताच भाजपला मोठा धक्का; महाराष्ट्रातील माजी केंद्रीय मंत्र्यांचा पक्षाला रामराम

Jun 22, 2024 09:16 PM IST

Suryakanta Patil Resignation From BJP : माजी केंद्रीय राज्यमंत्री आणिहिंगोली लोकसभेच्या माजी खासदार सूर्यकांता पाटील यांनी भाजपला सोड चिट्ठी दिली आहे. सूर्यकांता पाटील यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

महाराष्ट्रातील माजी केंद्रीय मंत्र्यांचा भाजपला रामराम
महाराष्ट्रातील माजी केंद्रीय मंत्र्यांचा भाजपला रामराम

Suryakanta Patil : लोकसभा निवडणुकीचे निकाल काही दिवासाआधीच लागले आहेत. हे निकाल भाजपसाठी काहीसे अनपेक्षित होते. त्यांना स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही. त्यानंतरएका महिला नेत्याने पक्षाला रामराम केला आहे. या नेत्या केंद्रात मंत्री देखील राहिल्या आहेत. या महिला नेत्याने राजीनामा दिल्याने भाजपसाठी हा मोठा आहे.माजी केंद्रीय राज्यमंत्री आणिहिंगोली लोकसभेच्या माजी खासदार सूर्यकांता पाटील यांनी भाजपला सोड चिट्ठी दिली आहे. सूर्यकांता पाटील यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी हदगाव विधानसभा संयोजक पदही सोडले आहे. सूर्यकांता पाटील यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला हिंगोली व नांदेड जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सूर्यकांता पाटील यांनी आपली परखड मते व्यक्त केली होती. त्यानंतर आता पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.सूर्यकांता पाटील यांनी चार वेळा खासदार, एक वेळा आमदार म्हणून हिंगोली-नांदेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.सूर्यकांता पाटील यांनी आपला राजीनामा भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.किशोर देशमुख यांच्याकडे सोपवला आहे.

सूर्यकांता पाटील यांचा राजकीय प्रवास -

सूर्यकांता पाटील यांनी १९७२ मध्ये भाजप महिला आघाडी प्रमुख म्हणून आपल्या राजकीय प्रवासाची सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन नगरसेवक ते खासदार अशी पदे भूषवली. त्यानंतर पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४ मध्ये त्या पुन्हा भाजपमध्ये दाखल झाल्या. नांदेड लोकसभा मतदारसंघातून सूर्यकांता पाटील यांनी निवडणूक लढविली होती. त्यानंतर हदगाव विधानसभा मतदारसंघातही त्यांनी निवडणूक लढविली होती. त्यांनी केंद्रात ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

काँग्रेस नेतेअशोक चव्हाणयांच्या भाजपमध्ये प्रवेशावरसूर्यकांता पाटील यांनीआपलेपरखड मत व्यक्त केले होते. भाजपचा पराभव अशोक चव्हाणांमुळेझाला नसूनउलट भाजपात येऊन अशोक चव्हाण यांनी स्वतःचंनुकसान करून घेतलं असल्याचं सूर्यकांता पाटील यांनी म्हटलं होतं.

सूर्यकांता पाटील यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे की,मी स्वमर्जीने माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा तथा माझ्या हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा देत आहे. आपल्या सोबत गेल्या १० वर्षात खूप काही शिकता आले. तालुक्यात बुथ कमिटीपर्यंत काम केले. आपण दिलेल्या संधीसाठी मी आपली व भारतीय जनता पार्टीची अत्यंत आभारी आहे. मी आपला निरोप घेत आहे. प्रत्यक्ष भेटीचा प्रयत्न केला पण आपल्या व्यस्ततेमुळे ते शक्य झाले नाही. कोणतीही कटुता मनात न ठेवता राजीनामा देत आहे, तो स्विकारावा हि नम्र विनंती' असे या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर