Bhusawal Murder news : भुसावळ शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. बुधवारी रात्री, काही अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत धावत्या गाडीवर गोळीबार करून येथील माजी नगरसेवक व आणखी एका व्यक्तीची हत्या केली. ही घटना रात्री १० च्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माजी नगरसेवक संतोष बारसे व संतोष राखुंडे अशी हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माजी नगरसेवक संतोष बारसे व संतोष राखुंडे हे कारमधून बुधवारी रात्री जात होते. त्यांची कार ही भुसावळ शहरातल्या जळगाव नाका मरी माता मंदिराजवळ आली असता यावेळी हल्लेखोर हे दुचाकीवरून आले. ते त्यांचा पाठलाग करत होते. त्यांनी धावत्या कारवर गोळीबार केला. हल्ले खोरांनी काही राऊंड फायर केले. या गोळीबारात संतोष बारसे आणि संतोष राखूंडे हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, त्यांना दवाखान्यात नेत असतांना त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनेची माहिती मिळताच परिसरात तणावाचे वातावरण तयार झंजले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला. यानंतर या ठिकाणी नागरिकांचा रोष पाहता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. हत्येचे कारण अद्याप पुढे आलेले नाही. मात्र, ही घटना पुर्ववैमनस्यातुन झाली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पिंपरी- चिंचवडच्या सांगवी परिसरात एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी रात्री १० च्या सुमारास घडली आहे. सांगवी पोलिस ठाण्याच्या जवळच ही घटना घडली असल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. पोलीसांनि घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास पथक नेमण्यात आले आहे.