Rvindra Dhangekar on the way to join Eknath Shinde Shivsena : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारत मोठं यश मिळवलं. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य पक्षाच्या निवडणुकीसाठी हे पक्ष सज्ज झाले असून त्य दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा ठाकरे गटासह आता काँग्रेसला सुद्धा मोठा धक्का देण्याची तयारी सुरू आहे. काँग्रेसचे कसबा पेटहेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार या चर्चांना उधाण आले आहे. तर ठाकरे गटाचे देखील ३ माजी आमदार व ६ बडे नेते यांनी एकनाथ शिंदे याची भेट घेतल्याने उद्धव ठाकरे गटाचे देखील टेंशन वाढणार आहे.
राज्यात सध्या पक्षपक्षांतरं, नव्या नेतृत्त्वाची निवड या सारख्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती पुन्हा महाविकास आघाडीला व विशेषत: ठाकरे गटाला जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे. ठाकरेंनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असतांना शिंदे गटानं 'ऑपरेशन टायगर' सुरू केले आहे. याचा भाग म्हणूंन ठाकरे गटाचे ६ बडे नेते उदय सामंत यांच्या नेतृत्त्वाखाली शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात आले आहे. या सर्वांनी उदय सामंत यांची शनिवारी भेट घेतली. या अंतर्गत शिवसेनेचे व काँग्रेसचे माजी आमदारांचा शिवसेनेत प्रवेश घेण्याची शक्यता आहे.
शिवसेना नेते उदय सामंत यांच्या नेतृवाखाली ठाकरे गटाचे ४, तर काँग्रेसच्या ५ माजी आमदारांनी एकनाथ शिंदे व उदय सामंत यांची भेट घेतली. यात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांचाही समावेश आहे. त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा चर्चा सरू झाल्या आहे. असे झाल्यास पुणे काँग्रेसला हा मोठा धक्का समजला जाणार आहे. रवींद्र धंगेकर व हुसेन दलवाई यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली. काँग्रेसचे दोन नेते एकनाथ शिंदेच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी देखील एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ते ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम करणार आहे. तर चंद्रकांत मोकाटे देखील ठाकरे यांच्या पक्षाला जय महाराष्ट्र करणार आहे.
काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर, ठाकरे गटाचे हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर, ठाकरे गटाचे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरीचे ठाकरे गटाचे माजी आमदार गणपत कदम, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमेश्वरचे ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने, नवी मुंबईतील कॅाग्रेस नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर रमाकांत म्हात्रे हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
संबंधित बातम्या