Sanjay Nirupam Quits Congress: महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections 2024) वारे वाहत असताना काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. संजय निरुपम यांनी पत्नी आणि मुलीसह एकनाथ (Eknath Shinde) शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला.
सामनाच्या हिंदी वृत्तपत्रात संपादक म्हणून काम केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना दिलेल्या संधीमुळे शिवसेनेत राजकीय कारकीर्द सुरू केलेल्या निरुपम यांच्यासाठी ही घरवापसी आहे. शिवसनेत असताना मतभेद झाल्यानंतर निरुपम यांनी २००५ मध्ये पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना निरुपम म्हणाले की, "मी आज शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. २० वर्षांनंतर शिवसेनेत प्रवेश करणे म्हणजे 'घर वापसी'आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार आहे. काँग्रेसमध्ये आज काय स्थिती आहे, हे तुम्हाला माहीत आहे."
संजय निरुपम हे मूळचे बिहारच्या रोहतास येथील रहिवासी आहेत. ते १९८० च्या दशकात मुंबईत आले आणि त्यांनी मुंबईला त्यांची कर्मभूमी बनवले. यानंतर १९९६ मध्ये शिवसेनेने त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले होते. मात्र, पक्षाची झालेल्या मतभेदानंतर त्यांनी २००५ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी काँग्रेसचे संसद सदस्य म्हणून काम केले. तसेच ते मुंबई काँग्रेस युनिटचे माजी अध्यक्षही होते.
निवडणूक खर्चात ताळमेळ लागत नसल्याने बारामती लोकसभेतील उमेदवार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली. तसेच दोन दिवसांच्या आत जबाब नोंदवण्याचे आदेश दिले. याबाबत जिल्हा खर्च निरीक्षण समितीकडे दाद मागता येणार आहे. सुळे आणि पवार यांनी दाखविलेल्या खर्चात अनुक्रमे १.३ लाख आणि ९.१० लाख रुपये खर्चाची मोठी तफावत आढळली आहे.
संबंधित बातम्या