मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amar Mulchandani arrest: सेवा विकास बँक घोटाळा; अमर मूलचंदानी यांच्यासह कुटुंबातील चौघांना अटक

Amar Mulchandani arrest: सेवा विकास बँक घोटाळा; अमर मूलचंदानी यांच्यासह कुटुंबातील चौघांना अटक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 29, 2023 10:52 AM IST

ED arrested Amar Mulchandani in Seva Vikas Bank Scam : ईडीचं छापासत्र राज्यात सुरूच असून पिंपरीतील सेवा विकास बँकेतील घोटाळा प्रकरणातील आरोपींवर दोन दिवसांपूर्वी छापे टाकण्यात आले होते. या प्रकरणी मुख्य आरोपी सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष ॲड. अमर मुलचंदानी यांच्या सह चौघांना अटक करण्यात आली आहे.

ED
ED

ED Raid in Pimpri : पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष ॲड. अमर मुलचंदानी यांच्यासह काही संचालकांवर ईडीने दोन दिवसांपूर्वी छापे टाकले होते. यावेळी बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप करून तब्बल ४०० कोटींहून अधिकचा घोटाळा केल्याचा ठपका ईडीने मुलचंदानी यांच्यावर ठेवला होता. दरम्यान, हा तपास करत असतांना अमर मूलचंदानी यांच्या दोन्ही भवांनी आणि मुलाने सहकार्य न करता अडथळे आणल्याचा ठपका ठेवत शनिवारी त्यांच्या भावांसह मुलाला अटक केली असून आणखी दोन महिलांना अटक अटक होण्याची शक्यता आहे.

ईडीचे अधिकारी तपास करत असतांना मुलचंदानी यांनी मोबाईलमधील बेहिशोबी कर्ज प्रकरणाशी संबधित माहिती डिलीट करून पुरावे नष्ट केले. या साठी त्यांचे दोन भाऊ आणि त्यांच्या मुलाने देखील तपास कार्यात अडथळे आणत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार या प्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिल्यावर शनिवारी रात्री अमर मुलचंदानी यांच्या पत्नी आणि ३ भावांसह एका कामगाराला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

मूलचंदानींसह संचालकांवर बनावट कागदपत्रांच्या आधारे १२४ कर्ज वाटप केल्याचे आणि यातून ४०० कोटींहून अधिकचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. पिंपरी- चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी अमर मूलचंदानी सह पाच जणांना अटक ही केली होती. काही महिन्यांपूर्वी मूलचंदानी जामिनावर बाहेर आले आणि शुक्रवारी ईडी ने छापा टाकला. आरबीआयने प्रशासक नेमलेल्या या बँकेत हजारो ठेविदारांच्या कोट्यवधींचा पैसा अडकून आहे.

 

WhatsApp channel