Heena gavit gave BJP Resign : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या लढतीचे चित्र स्पष्ट झालं आहे. सोमवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी अनेक बंडखोरांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. मात्र, नंदुरबार जिल्ह्यातील भाजपच्या उमेदवार यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. आज त्यांनी भाजपचा राजीनामा दिल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राजीनामा देतांना गावीत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली आहे.
राज्यात अनेक नाट्यपूर्ण राजकीय घडामोडी घडत आहेत. कोल्हापूर नंतर आता नंदुरबारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या ठिकाणी महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. भाजपनेत्या व माजी खासदार हिना गावीत यांनी अक्कलकुवा आक्रनी मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी त्यांचा अर्ज मागे न घेता लढण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर भाजप कारवाई करणार का या कडे लक्ष लागले होते. मात्र, पक्षाने कारवाई करण्यापूर्वीच उमेदवारीमुळे पक्ष अडचणीत येऊ नये असे म्हणत हिना गावीत यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे.
हिना गावीत यांनी शिवसेनेवर गंभीर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, शिवसेनेचे नंदुरबारमधील लोक भाजप विरोधात काम करत आहे. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. मी या बाबत वरिष्ठांकडे तक्रार केली होती. मात्र, या कडे दुर्लक्ष करण्यात आले. वरिष्ठ पातळीवरून या प्रकरणी कारवाई न करण्यात आल्याने मी निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे.
गावीत म्हणल्या, शिवसेना शिंदे गटाने भाजपचा फायदा घेत लोकसभा निवडणुकीत घाट केला. त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही. याच फटका भाजपला बसला. मी खासदार असताना अक्कलकुवा आक्रनी मतदारसंघात अनेक विकासाचे कामे केले असून मी केलेल्या विकास कामांचा फायदा मला मतदार मतदानाच्या स्वरूपात होणार असल्याने मी ही निवडणूक लढवत आहे. माझ्यामुळे पक्ष अडचणीत येऊ नये यासाठी मी राजीनामा देत असल्याचे गावित यांनी म्हटलं आहे.
हीना गावित या डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या असून त्या २०१४मध्ये या मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. यावेळी त्या सर्वात तरुण खासदार ठरल्या होत्या. तर २०१४ मध्ये देखील हीना गावित या लोकसभा निवडणुकीत निवडून आल्या होत्या.