Pune News : खंडणी आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी असलेले वाल्मीक कराड यांचे पुणे कनेक्शन उघड झाले आहे. वाल्मीक कराड यांचे पुण्यातील फर्ग्युसन रोडवर दुसऱ्या पत्नीच्या नावाने एका इमारतीत दोन ऑफिस घेतले असून या मालमत्तेप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक अडचणीत आले आहे. दत्ता खाडे असे या नगरसेवकाचे नाव असून त्यांची बीड जिल्हयातील केज येथे सीआयडीने चौकशी सुरू केली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला जात आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यावर वाल्मीक कराड फरार होता. वाल्मीक कराड हा पुण्यात खंडणीच्या गुन्हात सीआयडीला शरण आला होता. त्यानंतर वाल्मीक कराडची पुण्यातील संपत्ती उघड झाली होती. वाल्मीकचे पुण्यात बड्या सोसायटीत मोठे फ्लॅट नसल्याचं निष्पन्न झाले होते. तसेच त्याने पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर एका इमारतीत दुसऱ्या पत्नीच्या नवे दोन ऑफिस घेतल्याचे उघड झाले होते. हा व्यवहार भाजपचे माजी -नगरसेवक दत्ता खाडे यांच्या मध्यस्थीने झाल्याचा सीआयडीला संशय आहे. त्यामुळे त्यांना बीड येथे बोलावून त्यांची चौकशी करण्यात आली. सीआयडीला वाल्मिकची पुण्यात बेहिशेबी संपत्ती असल्याचा संशय असून त्याच दृष्टीने भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची केज येथे सीआयडीने कसून चौकशी सुरू केली आहे.
वाल्मीक कराड याच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे पुण्यात मोठी संपत्ती असल्याच निष्पन्न झालं आहे. फर्ग्युसन रोडवर दोन ऑफिस तर हडपसरमध्ये कोटयवधी रुपयांच्या सदनिका देखील कराडने विकत घेतल्या आहे. तर बाणेर येथे देखील कोटयावधी रुपयांच्या सदनिका आहे. या सदनिकांचे मालमत्ता कर थकवल्याने पिंपरीचिंचवड पालिकेने जप्तीची नोटिस या ठिकाणी लावली आहे.
सीआयडीने केलेल्या चौकशी बाबत दत्ता खाडे यांनी त्यांची बाजू मांडली आहे. खाडे म्हणाले, माझी चौकशी झाली असून मी जी काही उत्तर द्यायची आहेत, ती दिली आहेत. समाधानकारक उत्तरे मी दिली आहेत. माझे व गोपीनाथ मुंडे यांचे संबंध होते, त्यामुळे माझी कराडशी तोंड ओळख आहे. वाल्मिक कराडशी माझा कोणत्याही संबंध नाही. मी सीआयडीला पुर्णपणे सहकार्य करत असल्याचे खाडे म्हणाले.
संबंधित बातम्या