Pune Porsche case: रक्ताचा नमुना आईचा असल्याचे सिद्ध! न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल कोर्टात सादर-forensic report reveals teens blood sample swapped with mom pune porsche case ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Porsche case: रक्ताचा नमुना आईचा असल्याचे सिद्ध! न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल कोर्टात सादर

Pune Porsche case: रक्ताचा नमुना आईचा असल्याचे सिद्ध! न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल कोर्टात सादर

Jun 06, 2024 08:10 AM IST

Pune Porsche case: पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी आरोपीचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. मात्र, बदललेले रक्ताचे नमुने कुणाचे होते याचा पोलिस तपास करत होते. हे रक्ताचे नमुने कुणाचे होते याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे.

रक्ताचा नमुना आईचा असल्याचे सिद्ध! न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल कोर्टात सादर
रक्ताचा नमुना आईचा असल्याचे सिद्ध! न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल कोर्टात सादर

Pune Porsche case: पुण्यातील कल्याणीनगर येथे विशाल अगरवाल या बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने आलीशान पोर्शे कार भरधाव वेगात चालवत दोघांना चिरडले होते. हा पघात झाल्यावर त्याला अटक करून त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी ससुनमध्ये नेण्यात आले होते. मात्र, अर्थपूर्ण व्यवहार झाल्यावर हे नमुने बदलण्यात आले होते. या प्रकरणी सध्या ससुनचे डॉक्टर व शिपायाला आणि अगरवाल दाम्पत्याला अटक केली असून ते पोलिस कोठडीत आहे. दरम्यान, मुलाचे बदलले रक्ताचे नमुने कुणाचे होते, या बाबत पोलिस तपासात महत्वाची माहिती पुढे आली आहे. न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवालात बदललेले रक्ताचे नमुने हे आरोपी मुलाची आई शिवानी अगरवाल यांचे असल्याचे तपासात पुढे आले आहे.

Sanjay Raut : “मोदींनी शपथ घेतली तरी सरकार टीकणार नाही; सत्ता स्थापनेसाठी योग्यवेळी पावले उचलणार: संजय राऊत

कल्याणीनगर अपघात प्रकरणात रोज अनेक बाबी पुढे येत आहेत. मुलाला वाचविण्यासाठी आई शिवानी अगरवालने मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून त्यांच्या रक्ताचे नमुने दिला असल्याचे प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशालेच्या अहवालात पुढे आले आहे. हा अहवाल पुढे पोलिसांनी बुधवारी न्यायालयात सादर केला. यानंतर न्यायालयाने अल्पवयीन मुलीच्या पालकांना १० जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर ससूनमधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांना ७ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नरेंद्र मोदी ८ जून रोजी घेणार पंतप्रधानपदाची शपथ! ‘या’ देशांना पाठवले आमंत्रण; शिवसेना, राष्ट्रवादीला मंत्रीमंडळात जागा

कल्याणीनगर अपघात प्रकरणात शिवानी अगरवाल, विशाल अगरवाल (दोघे रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ससूनचे डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपली होती. त्यांना बुधवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते.

आरोपी मुलाचे रक्ताचे नमुने बदलून शिवानी अगरवाल यांनी स्वत:चे रक्ताचे नमुने दिले होते. हे नमुने पोलिसांनी जप्त केले होते. तसेच ते तपासण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होत. याकहा अहवाल सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सादर केला. तसेच या प्रकरणी आणखी तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ मिळावी अशी मागणी केली.

Maharashtra Weather Update : मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्यात जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिला 'हा' अलर्ट

तर आरोपींचे वकील ॲड. सुधीर शहा, ॲड. ऋषिकेश गानू, ॲड. प्रशांत पाटील, ॲड. विपूल दुशिंग, ॲड. शिवम निंबाळकर यांनी बाजू मांडत आरोपी तपासात सहकार्य करतील तसेच झालेला पोलिस तपास पाहता आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. दोन्ही बाजू ऐकून न्यायालयाने आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ केली.

फरासखाना कोठडीत अस्वच्छतेशी शिवानी अगरवाल यांची तक्रार

शिवानी अगरवाल यांना पोलिस कोठडीसाठी फरासखाना पोलीस ठाण्याच्या असलेल्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. मात्र, या कोठडीत अस्वच्छता असल्याची तक्रार त्यांनी कोर्टात केली. या अस्वच्छतेमुळे त्रास होत असल्याचे त्यांनी संगितले. दारम्यान, याची दाखल कोर्टाने घेतली असून वकिलांमार्फत न्यायालयात तक्रार नोंदवावी, असे आदेश दिले

विभाग