कबुतरांना खाद्य टाकताय तर हे वाचा! पुणे महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड; रोगराई वाढत असल्यानं निर्णय
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कबुतरांना खाद्य टाकताय तर हे वाचा! पुणे महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड; रोगराई वाढत असल्यानं निर्णय

कबुतरांना खाद्य टाकताय तर हे वाचा! पुणे महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड; रोगराई वाढत असल्यानं निर्णय

Dec 09, 2024 09:54 AM IST

Pune news : पुण्यात कबुतरांची संख्या वाढत चालली असून त्यामूळे रोगराई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याची दखल पुणे महानगर पालिकेने घेतली आहे. त्यामुळे या पुढे कबुतरांना खाद्य टाकल्यास पालिका दंड वसूल करणार आहे.

कबुतरांना खाद्य टाकताय तर ही बातमी वाचा! पुणे महानगर पालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड; रोगराई वाढत असल्याने निर्णय
कबुतरांना खाद्य टाकताय तर ही बातमी वाचा! पुणे महानगर पालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड; रोगराई वाढत असल्याने निर्णय (HT_PRINT)

Pune news : पुण्यात कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कबुतरांच्या विष्ठेमुळे मोठ्या प्रमाणात रोगराई वाढत आहे. असे असतांना नागरिक कबुतरांना मोठ्या प्रमाणात खायला देतात. यामुळे देखील त्यांची संख्या वाढल्याने आता पालिकेने कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यापुढे कबुतरांना दाणे टाकल्यास ५०० ते ५००० रुपये दंड पुणेकरांना भरावा लागणार आहे. त्यामुळे कबुतर आ नाही तर कबुतर जा म्हणण्याची वेळ आली आहे.

पुण्यात कबुतरांची वाढती संख्या व त्यांच्या विष्ठेपासून नागरिकांना अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवत आहेत. याची दखल पुणे महापालिकेने घेतली असून शहरातील ज्या भागात कबुतर बसलेले असतात तेथून त्यांना हटविण्याची उपाय योजना सुरू करण्यात आल्या आहेत. शनिवार पेठ येथील नेने घाट परिसरात कबुतरांना हटविण्यासाठी कर्मचाऱ्यांची तैनात केले आहेत. तसेच या ठिकाणी धान्य टाकण्यास देखील मनाई केली आहे. जर कुणी यापुढे धान्य टाकल्यास त्यांच्यावर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

शहरातील विविध भागांत कबुतरांना धान्य टाकले जाते. यामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात कबुतरांची संख्या वाढल्याचे आढळलं होतं. कबुतरांच्या त्रासामुळे पालिकेचा आरोग्य विभाग, पर्यावरण विभागायने आता थेट मोहीम हाती घेतली आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी कबुतरांनया धान्य टाकणाऱ्यांवर कारवाईचे आदेश घनकचरा विभागाला पुन्हा दिले आहेत. 

कर्मचाऱ्यांची पथके तयार करून ज्या भागात कबुतरांना धान्य टाकलं जाते, तेथे गस्त घातली जात आहे. या सोबतच त्यांना धान्य टाकण्यात येऊ नये, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करून ठीक ठिकाणी बोर्ड देखील लवले आजात आहे. यातून त्यांना कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या आजारांची, व त्रासाची माहिती दिली जात आहे. त्यामुळे ज्यांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केलं आहे, त्याच्यावर आता पालिकेने दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पाचशे ते पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. आतापर्यंत वारजे माळवाडी, नदीपात्र परिसर अष्टभुजा घाट, नेने घाट परिसर तसेच स्वारगेट परिसर, सारसबाग परिसरात पारवे बसतात तेथे धान्य टाकणाऱ्यांकडून पालिकेने दंड वसूल करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये पाच ते सात जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

काय होतो आजार ? 

कबुतरांच्या विष्टेमुळे व पिसांमुळे दम्यासारखे आजार होतात. याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होता. त्यामुळे कबुतरांना धान्य टाकू नये असे आवाहन महापालिकेने केले आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर