Pune Flood : पुण्यात पाणी ओसरले; पण घरांमध्ये चिखलाचं साम्राज्य; मुख्यमंत्री शिंदेंनी प्रशासनाला दिला महत्वाचा आदेश
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Flood : पुण्यात पाणी ओसरले; पण घरांमध्ये चिखलाचं साम्राज्य; मुख्यमंत्री शिंदेंनी प्रशासनाला दिला महत्वाचा आदेश

Pune Flood : पुण्यात पाणी ओसरले; पण घरांमध्ये चिखलाचं साम्राज्य; मुख्यमंत्री शिंदेंनी प्रशासनाला दिला महत्वाचा आदेश

Jul 26, 2024 04:57 PM IST

Pune flood aftermath : पुण्यात गुरुवारी झालेल्या पावसामुळे अनेक घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले. पुरग्रस्त भागात तातडीने स्वच्छता मोहीम राबवून युद्धपातळीवर काम करण्याचे व पंचनामे करण्याचे काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

पुण्यात पाणी ओसरले; पण घरांमध्ये चिखलाचं साम्राज्य; मुख्यमंत्री शिंदेंनी प्रशासनाला दिला महत्वाचा आदेश
पुण्यात पाणी ओसरले; पण घरांमध्ये चिखलाचं साम्राज्य; मुख्यमंत्री शिंदेंनी प्रशासनाला दिला महत्वाचा आदेश

Pune flood aftermath : पुण्याला गुरुवारी पावसाने झोडपले. या पावसामुळे सिंहगड रोड परिसरातील संचायनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलाची वाडी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल व घाणीचे साम्राज्य पसरले. ययाची दखल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. पुण्यातील पुरबाधित परिसरात घरांमधील चिखल, गाळ व कचरा तातडीने साफ करण्यात यावा. या साठी महापालिका तसेच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहिम राबवावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. या सोबतच शेतीचे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे हे तातडीने करण्यात यावे असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ, सुहास दिवसे यांना केल्या आहेत.

पुण्यातील सिंहगड रोड, संचयनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागात काल खडकवासला धरणातून पाणी सोडल्यामुळे पुरस्थिती निर्माण झाली. सिंहगड परिसरातील काही सोसायट्या व घरांमध्ये पुराच्या पाण्यामुळे चिखल व गाळ मोठ्या प्रमाणात साचला आहे. त्यामुळे याभागातील रहिवाशांचे आरोग्य सध्या धोक्यात आले आहे. पुण्यात साथ रोग वाढले असल्याने तसेच घाण पाण्यामुळे इतर आजार पसरू नये यासाठी त्वरित स्वच्छता मोहीम राबवून हा परिसर स्वच्छ करण्यात यावा असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. जिल्हा प्रशासनाने देहिल याची दखल घेतली असून डीप क्लीन मोहिम राबविण्यास सुरूवात केली आहे.

स्वच्छतेसाठी खासगी कंपन्यांची मदत घ्या

शिंदे म्हणाले, घरांमध्ये शिरलेल्या पुराच्या पाण्यामुळे झालेला चिखल साफ करण्यासाठी सुमित इंटरप्राईजेस आणि बीव्हीजी या खासगी स्वच्छता कंपन्यांची मदत घ्यावी. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाची दखल घेऊन सुमित कंपनी ५०० स्वच्छता कर्मचारी व बीव्हीजी कंपनी १०० सफाई कर्मचारी या परिसरात स्वच्छतेच्या कामासाठी उपलब्ध करून दिले आहे. या कर्मचाऱ्यांचा माध्यमातून घरांमधील चिखल काढून साफसफाई करण्यात यावी, असे मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला सांगितले आहे.

औषध फवारणी करा!

पुराचे पाणी, चिखल यामुळे परीसरात रोगराई पसरू नये यासाठी महापालिका प्रशासनाने औषधांची फवारणी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर