वाल्मिक कराडला पिंपरी-चिंचवड पालिकेचा दणका! वाकडमधील अलिशान फ्लॅट करणार सील; 'हे' आहे कारण
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  वाल्मिक कराडला पिंपरी-चिंचवड पालिकेचा दणका! वाकडमधील अलिशान फ्लॅट करणार सील; 'हे' आहे कारण

वाल्मिक कराडला पिंपरी-चिंचवड पालिकेचा दणका! वाकडमधील अलिशान फ्लॅट करणार सील; 'हे' आहे कारण

Jan 16, 2025 07:53 AM IST

PCMC sealed flat of valmik karad in Wakad : पिंपरी-चिंचवड पालिकेने वाल्मीक कराडला मोठा दणका दिला आहे. वाकड येथील फ्लॅट पालिकेने सील केला आहे. पार्क स्ट्रीट गृहनिर्माण सोसायटीच्या आयव्हरी इमारतीच्या सहाव्या मजल्यावर ६०१ क्रमांकाचा वाल्मीक कराड व त्याची पत्नी मंजली कराडयांचा हा फ्लॅट आहे.

वाल्मीक कराडला पिंपरी-चिंचवड पालिकेचा दणका! वाकडमधील अलिशाल फ्लॅट करणार सील; 'हे' आहे कारण
वाल्मीक कराडला पिंपरी-चिंचवड पालिकेचा दणका! वाकडमधील अलिशाल फ्लॅट करणार सील; 'हे' आहे कारण

PCMC sealed flat of valmik karad in Wakad : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील प्रमुख आरोपी व बीडमधील पवनचक्की उद्योजकाकडे खंडणी मागितल्या प्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) गुन्हा दाखल झालेल्या वाल्मीक कराडच्या अडचणी वाढल्या आहेत. वाल्मीक कराडला पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने आता मोठा दणका दिला आहे. वाल्मीक करादचा वाकड येथील एक फ्लॅट सील करण्यात येणार आहे. या फ्लॅटचा तब्बल दीड लाख रुपयांचा मालमत्ता कर कराडने थकवल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड अडचणीत आला आहे. या हत्या प्रकरणी कराडला ७ दिवसांची एसआयटी कोठडी देण्यात आली आहे. वाल्मीक हा पुण्यात सीआयडीला शरण आला होता. दरम्यान, आता वाल्मिक कराड याच्या संपत्तीचीही चर्चा सुरू आहे. पुण्यातील वाल्मिक कराडच्या फ्लॅटची व इतर संपत्तीची चर्चा सुरू आहे. त्याचे कारण देखील महत्वाचे आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीत वाल्मीक कराड व त्याच्या पत्नीचा ४ बीएचके फ्लॅट आहे. येथील पार्क स्ट्रीट गृहनिर्माण सोसायटीच्या आयव्हरी इमारतीच्या सहाव्या मजल्यावर ६०१ क्रमांकाचा वाल्मीकचा फ्लॅट आहे. हा फ्लॅट १६ जून २०२१ रोजी खरेदी करण्यात आला होता. मात्र, तेव्हापासून याचा मालमत्ता कर भरला नसल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने आता कराडच्या सदनिकेवर जप्तीची नोटिस चिकटवली आहे.

मालमत्ता कर थकवला

वाल्मीकने या सदनिकेचा तब्बल १ लाख ५५ हजार ४४४ रुपयांचा मालमत्ता कर थकवला आहे. त्यामुळे सदनिका सील केली जाणार आहे. कराड याची वाकड येथे आणखी एक फ्लॅट असल्याचं उघड झालं आहे. या फ्लॅटचा १ लाख ५५ हजारांचा कर देखील त्याने थकवला आहे. त्यामुळे हा फ्लॅट सील करण्यात येणार असून कर न भरल्यास त्याचा लिलाव करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.

या सोबतच पिंक सिटी रोडवरील मि कासा बेला सोसायटीतील देखील ४०३ नंबरचा फ्लॅट वाल्मीकच्या नावावर आहे. १ एप्रिल २०२१६ पासून हा फ्लॅट अंजली कराड यांच्या नावे असल्याची नोंद पिंपरी पालिकेच्या करसंकलन विभागाकडे आहे. या फ्लॅटची किंमत १ कोटी आहे.

फर्ग्युसन रस्त्यावर २५ कोटी रुपयांची घेतली ६ ऑफिस

पुण्यात फर्ग्युसन रस्त्यावर वाल्मिक कराडची प्रॉपर्टी असल्याचे उघड झालं आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोरच तयार होत असलेल्या एक इमारतीत वाल्मिक कराडने २५ कोटी रुपये खर्च कूरन ६ ऑफिसेस विकत घेतले आहे. वाल्मिक कराड, एक महिला आणि विष्णू चाटेच्या नावावर हे ऑफिस बुक करण्यात आले आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर