Five drown in bhushi dam : लोणावळा येथील भुशी डॅम ओव्हर फ्लो झाला असून या धरणात वर्षा पर्यटनासाठी आलेले पुण्यातील पाच तरुण बुडाले असल्याची माहिती आहे. यातील दोन तरुणांचे मृतदेह सापडले असून तिघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
पुण्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लोणावळ्यातील घाट परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. शनिवार आणि रविवार जोरदार पाऊस असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली होती. येथील भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. या धारणांच्या पायऱ्यावर हजारो पर्यटकांनी धरणाच्या पाण्यात आनंद लुटला. पुण्यातील सय्यद नगर येथील काही तरुण लोणावळ्यातील भुशी डॅम येथे वर्षा पर्यटनासाठी आले होते. या परिसरात मोठा पाऊस सुरू आहे. हे तरुण पोहण्यासाठी धरण परिसरात उतरले होते. यावेळी पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने हे तरुण धारण्याच्या बॅक वॉटरच्या पाण्यात बुडाले. धरणात तरुण बुडल्याची माहिती मिळताच पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांनी पाण्यात शोध मोहीम राहून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. तर तिघांचा शोध अद्याप सुरू आहे. बुडालेल्या पाच जणांची नावे समजू शकलेली नाही.
लोणावळा परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. भुशी डॅम सह या परिसरातील अनेक धबधबे वाहू लागले आहे. पावसाचा आनंद घेण्यासाठी येथे जात असतांना काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
लोणावळ्यातील पर्यटन स्थळ असलेलं भुशी धरण परिसरात शनिवारी अनाई रविवारी सुट्टी असल्याने मोठी गर्दी झाली होती. पुणे व मुंबईसह राज्यातील विविध भागांतून पर्यटक भुशी धरणात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. लोणावळ्यात सतत पाऊस कोसळत असल्यामुळे अखेर भुशी धरण हे ओव्हरफ्लो झाले आहे. भुशी डॅमसह लायन्स पॉईंट टायगर पॉईंट येथीही पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.
संबंधित बातम्या