Mumbai goregaon Crime News : भक्ती, पूजा आणि मनशांतीसाठी नागरिक मंदिरात जात असतात. मात्र, याच पवित्र ठिकाणी एका पूजाऱ्याने एका तरुणीसोबत अतिप्रसंगी करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार मुंबईतील गोरेगाव येथे उघडकीस आला आहे. येथील जवाहरनगरच्या गावदेवी मंदिरात ही घटना घडली असून आरोपी पूजऱ्याने पाच वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याने संतापाचे वातावरण आहे. या घटनेमुळे मंदिरात देखील महिला आणि मुली असुरक्षित असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी आरोपी पूजाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
पुजारी शिवम पांडे असे आरोपीचे नाव आहे. ही घटना गोरेगावच्या गावदेवी मंदिरात १२ जून रोजी घडली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात पीडिटेच्या नातेवाइकांनी तक्रार दिल्यावर आरोपी पूजाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित ५ वर्षीय मुलगी ही १२ जून रोजी सायंकाळी ७ वाजता गावदेवी मंदिरात देवदर्शनासाठी गेली होती.
यावेळी पुजाऱ्याने तिच्या सोबत आक्षेपार्ह वर्तन केले. तिला प्रसाद देण्याच्या बहाण्याने आरोपी पुजारी शिवम पांडे याने मुलीला मंदिराच्या मागील बाजूस नेत तिच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलगी दिसत नसल्याने तिच्या नतेवाइकाने तिचा शोध घेतला असता आरोपी शिवंम पांडे हा मुलीशी गैरकृत्य करतांना दिसला. यानंतर हा प्रकार उघड झाला.
या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियाने गोरेगाव पोलिस ठाणे गाठत आरोपी शिवं पांडे याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार गोरेगाव पोलिसांनी आरोपी पुजारी शिवम पांडेच्या विरोधात कलम ३५४ (अ), व पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी पुजारी शिवम पांडेला पोलिसांनी अटक देखील केली आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे मात्र, परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांनी संताप व्यक्त करत आता मंदिरातही मुली सुरक्षित नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी देखील त्यांनी केली आहे.
संबंधित बातम्या