Kalyan news : ५ वर्षीय मुलावर शाळेतील शौचालयात अनैसर्गिक अत्याचार, डान्स शिक्षकाचे कृत्य
Kalyan Crime News : कल्याण पूर्व येथे एका पाच वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. एका नामांकित शाळेत हा प्रकार घडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कल्याणपूर्वक गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कल्याण पूर्व येथे एका पाच वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. एका नामांकित शाळेत हा प्रकार घडला आहे. पाच वर्षाच्या अल्पवयीन मुलावर शाळेत डान्स शिकवण्यासाठी आलेल्या डान्स टीचरने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी डान्स शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी घडली होती. मात्र शनिवार रविवारी शाळा बंद असल्याने आज (सोमवार) आई वडिल शाळेत पोहचले आणि शाळेला माहिती दिल्यानंतर ही घटना समोर आली. मुलासोबत शाळेच्या शौचालयात लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील एका नामांकित शाळेत हा प्रकार घडला आहे. शाळेत डान्स शिकवण्यासाठी आलेल्या शिक्षकाने पाच वर्षाच्या मुलाचे लैंगिक शोषण केले. या प्रकाराने पीडित मुलाच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. मुलाने त्यांना सांगितलं की,त्याच्यासोबत काही तरी अनैतिक प्रकार घडला आहे. या बाबत आई वडिलांनी शाळेत जाऊन याचा जाब विचारला.
या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी डान्स शिक्षकाला अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे.
विभाग