Bhushi Dam : भुशी धरणावर पर्यटनासाठी पुण्यातून आलेल्या कुटूंबातील ५ जण गेले वाहून; काळजाचा ठोका चुकवणारा Video
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhushi Dam : भुशी धरणावर पर्यटनासाठी पुण्यातून आलेल्या कुटूंबातील ५ जण गेले वाहून; काळजाचा ठोका चुकवणारा Video

Bhushi Dam : भुशी धरणावर पर्यटनासाठी पुण्यातून आलेल्या कुटूंबातील ५ जण गेले वाहून; काळजाचा ठोका चुकवणारा Video

Jun 30, 2024 11:43 PM IST

Bhushi Dam : वर्षविहारासाठी पुण्यातून भुशी धरणावर आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. यामध्ये लहान मुलांसह एका महिलेचाही समावेश आहे.

भुशी धरणावर पर्यटनासाठी पुण्यातून आलेल्या कुटूंबातील ५ जण गेले वाहून
भुशी धरणावर पर्यटनासाठी पुण्यातून आलेल्या कुटूंबातील ५ जण गेले वाहून

लोणावळा शहरात वर्षविहारासाठी पुण्यातून गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. यामध्ये लहान मुलांसह एका महिलेचाही समावेश आहे. भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या एका धबधब्याच्या वेगवान प्रवाहातून ५ जण धरणात वाहून गेल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. त्यातील २ जणांचा मृतदेह सापडला असून इतर तिघांचा शोध सुरू आहे. शिवदुर्ग रेसक्यू पथकाकडून शोधमोहीम सुरू आहे.

पुण्यातील अन्सारी कुटुंब भुशी डॅमजवळील धबधब्यात भिजण्याचा आनंद घेत होते. यादरम्यान अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि ते बघता बघता पाण्यात वाहून जाऊ लागले. तेथे उपस्थित पर्यटकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना वाचवण्यासाठी वेळ खूप कमी होता. सर्वांच्या डोळ्यादेखत काही क्षणात ते दिसेनासे झाले.

गेल्या आठवड्यापासून पावसाने जोर पकडला असून अनेक धरणे ओव्हर फ्लो झाली असून धबधबेही प्रवाहित झाले आहेत. लोणावळ्यातील भूशी धरण पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. मुंबई आणि पुणे शहरातील अनेक पर्यटकांटी पावले लोणावळ्याकडे वळतात. लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हर फ्लो होणे म्हणजे पर्वणीच असते. मात्र,कधीकधी उत्साहाच्या भरात दुर्दैवी घटनाही या परिसरात घडतात. अशीच एक घटना भुशी डॅम परिसरात घडली आहे.

पुण्यातील अन्सारी कुटुंब वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील भुशी धरणावर आले होते.भुशी धरणाच्या परिसरातजोरदार पाऊस झाल्यानेडोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित होऊन धरणात येतआहेत. रविवारी धरणहीओव्हर फ्लो झाले. काही पर्यटक रेल्वेचे विश्रांती गृह असलेल्या भागात डोंगरातून वाहणाऱ्या धबधब्यातून वाहणाऱ्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेत होते. 

त्यावेळी रेल्वे वॉटर फॉलवर भिजत असताना पाण्याच्या प्रवाह वाढल्याने पाच जण वाहून जाऊ लागले. एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या प्रवाहापुढं त्यांचा निभाव लागला नाही. एकाच कुटुंबातील ५ जण वाहून गेले. दरम्यान या दुर्घटनेनंतर ३६ वर्षीय महिला, एक १३ वर्षीय आणि एका ८ वर्षीय मुलीचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. याशिवाय ९ वर्षांचा आणि एका चार वर्षाच्या मुलाचा शोध सुरू आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर