Republic Day Parade: अवघ्या काही दिवसांवर प्रजासत्ताक दिवस येऊन ठेपला आहे. या सोहळ्यात देशाच्या लष्करी सामर्थ्यासह विविध राज्यातील सांस्कृतिकतेचे दर्शन होत असतं. तसेच सीमेवर साहस बजावलेल्या वीरांचा सन्मान देखील यावेळी केला जातो. या सोहळ्यासाठी देशातूनचं नाही तर जगभरातून पाहुण्यांना आमंत्रित केलं जातं. यंदाचा प्रजासत्ताक दीन सोहळा मुंबईकरांसाठी खास असणार आहे. या सोहळ्यासाठी मुंबईच्या पाच जणांना खास आमंत्रण देण्यात आले आहे. त्याचे कारण देखील विशेष आहे.
यंदा २६ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथील कर्तव्य पथ येथे प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्यासाठी मुंबईतील पाच विशेष पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईसह राज्याला हा बहुमान मिळाला आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्यात देशभरातून १० हजार, तर महाराष्ट्रातून २३ विशेष पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या २३ मध्ये अतुल जाधव, वैभव पाटील, पद्मश्री ब्रहादेव पंडित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभय ब्रह्मदेव पंडित या पाच जणांना या सोहळ्यासाठी बोलावण्यात आलं आहे.
मुंबई विभागातून अॅटॉप हिल येथील अतुल जाधव, वसई पश्चिम येथील वैभव पाटील यांची पंतप्रधान यशस्वी योजनेच्या श्रेणीतून निवड झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर विशेष गुणांसह नामांकित शैक्षणिक संस्थांमधील गुणवंतांची पंतप्रधान यशस्वी योजनेतून निवड केली जाते, तर पद्मश्री ब्रहादेव पंडित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभय ब्रह्मदेव पंडित या पिता-पुत्रांना महाराष्ट्र टेक्सटाईल (हस्तकला) श्रेणीअंतर्गत आमंत्रित केले आहे. व बदलापूर पश्चिम येथील अंगणवाडी सहायक आयुक्त उज्ज्वला पाटील यांना डब्ल्यूसीडी या श्रेणीअंतर्गत त्यांना आमंत्रित करण्यात आले. मुंबईतील अंगणवाड्यांत लसीकरण ते पोषण आहारापर्यंत सर्व उपक्रमांत उत्कृष्ट अंमलबजावणी केल्यामुळे आमच्या विभागाचे कौतुक करण्यात आले असून यामुळे माझ्या नावाचे प्रजासत्ताक कार्यक्रमासाठी माझे नाव सुचविल्याबद्दल मला अभिमान आहे, असे एकात्मिक बाल विकास योजना सेवा सहायक आयुक्त पदावर कार्यरत उज्ज्वला पाटील यांनी म्हणाल्या.
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्याची अनेक दिवसांपासून इच्छा होती. ती अखेर पूर्ण होणार आहे. या सोहळ्यात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळणे ही आमच्या सर्व कुटुंबासाठी अभिमानाची गोष्ट असून ही बाब म्हणजे हस्तकला क्षेत्राचा सन्मान आहे असे ब्रह्मदेव पंडित आणि अभय पंडित म्हणाले.
या बाबद अतुल जाधव म्हणाले, माझे गाव सोकासन आहे. हे गाव सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात वसलेले आहे. मी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. माझे आई-वडील गावी शेती करतात. तिरुचिरापतल्ली येथील आयआयएममध्ये एमबीएसाठी प्रवेश घेताना सामायिक परीक्षेत ९८ टक्के गुण मिळाले होते. त्या आधारे महाविद्यालयाने माझे नाव पाठविले होते. पीएम यशस्वीसाठी २० जणांमधून माझी निवड झाली, पण त्यानंतर प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण येईल असे वाटले नव्हते.
संबंधित बातम्या