Nashik Accident News Today: नाशिक- दिंडोरी मार्गावरील (Nashik Dindori Road) ढकांबे गावाजवळ (Dhakambe Village) भरधाव कार आणि दुचाकीमध्ये (Car And bike accident) भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
नाशिक - दिंडोरी मार्गावर ढकांबे गावाजवळ दुपारी दोन वाजताच्या सुमारास भरधाव बोलेरो कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, तीन जण जखमी झाले. जखमींना म्हसरूळ येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. कारचा टायर फुटल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले. पोलिसांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने सर्वांचे मृतदेह नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले.
मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो कारमधून काही भाविक सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेऊन नाशिककडे येत होते, अशी णाहिती आहे. या अपघातात मरण मावलेल्या मृतांची आणि जखमींची नावे अद्याप समजू शकलेले नाहीत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. गेल्या काही वर्षात रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळते. गतमीमान प्रवास आणि अतिघाई अपघाताचे प्रमुख कारण ठरत आहे.
पुण्यातील खडकी परिसरात चारचाकी वाहनाच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (३ एप्रिल २०२४) सकाळी पावणे नऊच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती सराफ गल्लीतून व्यापारी मित्रमंडळाच्या चौकाकडे पायी जात होता. त्यावेळी रस्त्यावर वाहनाची प्रचंड गर्दी होती. रस्ता ओलांडताना एका वाहनाचा त्याला धक्का लागला आणि तो खाली पडला. त्याचक्षणी दुसरी चारचाकी त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी अपघात झाल्याने रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.