मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Buldhana News: मुंबई- संभाजीनगर -नागपूर महामार्गावर भीषण अपघात; एसटी बस आणि ट्रकच्या धडकेत ५ ठार; १३ प्रवासी जखमी

Buldhana News: मुंबई- संभाजीनगर -नागपूर महामार्गावर भीषण अपघात; एसटी बस आणि ट्रकच्या धडकेत ५ ठार; १३ प्रवासी जखमी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 23, 2023 08:00 AM IST

Buldhana News: मुंबई - संभाजीनगर- नागपूर महामार्गावर एस टी बस आणि ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे

accident news
accident news (HT)

बुलढाणा : मुंबई - संभाजीनगर- नागपूर महामार्गावर अपघातांची मालिका ही सुरूच आहे. या मार्गावर आज पहाटेच्या सुमारास एस टी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात बसमधील पाच प्रवशांचा मृत्यू झाला आहे. तर १३ प्रवासी जखमी आहेत. जखमींमध्ये पाच प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून जखमींवर सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बस चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई - नागपूर जुन्या महामार्गावर बुलढाण्यातील सिंदखेडराजा जवळ एसटी बस आणि ट्रकचा हा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर १३ जण जखमी झाले आहेत. भरधाव ट्रक आणि एसटीच्या धडकेनं हा भयंकर अपघात घडला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. जखमींवर सिंदखेडराजा रुग्णालयाच उपचार सुरु आहेत. अपघातास्थळी पोलीस आणि स्थानिकांकडून बचावकार्य सुरु आहे.

 दरम्यान काल देखील शेगांव जवळ पंढरपूरहून परत येणाऱ्या भाविकांच्या गाडीच्या अपघात झाला होता. या अपघातात तीन भाविक ठार तर सात जण जखमी झाले होते. 

IPL_Entry_Point

विभाग