मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Railway Megablock : मुंबईत मध्य रेल्वेचा रात्रकालीन ब्लॉक; 'या' लोकल ट्रेन पाच दिवस राहणार बंद

Mumbai Railway Megablock : मुंबईत मध्य रेल्वेचा रात्रकालीन ब्लॉक; 'या' लोकल ट्रेन पाच दिवस राहणार बंद

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 15, 2023 09:30 AM IST

Mumbai Railway Mega block news : कर्जत आणि भिवपुरी रोड या स्थानकांदरम्यान डाऊन मार्गावरील रुळांमधील स्लीपर्सची दुरुस्ती आणि खडीची स्वच्छता करण्यासाठी बीएसएम मशिनच्या मदतीने काम करण्यात येणार असल्याने या मार्गावर मध्यरेल्वेने रात्रकालीन मेगा ब्लॉक जाहीर केला आहे.

Mega Block
Mega Block

मुंबई : कर्जत आणि भिवपुरी रोड या स्थानकांदरम्यान डाऊन मार्गावरील रुळांमधील स्लीपर्सची दुरुस्ती केली जाणार आहे. यासाठी बीएसएम मशीन वापरली जाणार असून या साठी मध्य रेल्वेने रात्र कालीन मेगा ब्लॉक घोषित केला आहे. या मेगा ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणारी शेवटची कर्जत लोकल आणि कर्जत येथून सुटणारी पहिली सीएसएमटी लोकल आज पासून पुढील पाच दिवस रद्द करण्यात आली असून १९ तारखेपर्यंत ही गाडी बंद राहणार असल्याने याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

या मेगा ब्लॉकमुळे रात्री उशिरा घरी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. यामुळे याची दखल घेऊन घरी जाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. रेल्वे प्रशासाने दिलेल्या माहितीनुसार हा मेगाब्लॉक पुढील पाच दिवस मध्यरात्री १.५० ते पहाटे ४.५० वाजेपर्यंत राहणार आहे.

या कालावधीत सीएसएमटीहून कर्जतसाठी रात्री १२.२४ वाजता सुटणारी शेवटची लोकल आणि कर्जतहून सीएसएमटीसाठी निघणारी मध्यरात्री २.३३ची पहिली लोकल रद्द करण्यात आली आहे. कर्जतहून पहिल्या लोकलने भाऊच्या धक्क्यावर मासे घेण्यासाठी आणि कामावर येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, ही लोकल रद्द केल्याने पहिली लोकल एक तास विलंबाने येणार असल्याने कामाला जायला प्रवाशांना उशीर होणार आहे.

असे असणार ब्लॉक काळातील वेळापत्रक

शेवटची लोकल : सीएसएमटी ते कर्जत - रात्री ११.३०

पहिली लोकल : कर्जत ते सीएसएमटी - पहाटे ३.४०

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या