Fish Bone Stuck In Throat : घशात अडकलेला माशाचा काटा दोन महिन्यांनी काढला, रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Fish Bone Stuck In Throat : घशात अडकलेला माशाचा काटा दोन महिन्यांनी काढला, रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

Fish Bone Stuck In Throat : घशात अडकलेला माशाचा काटा दोन महिन्यांनी काढला, रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

Published Feb 23, 2024 01:27 PM IST

Fish Bone Stuck In Throat: चिपळूण येथील एका रुग्णाच्या घशात अडकलेला माशाच्या काटा अवघड शस्त्रक्रिया काढून तब्बल दोन महिन्यांनी काढण्यात आला आहे. दरम्यान, कोणत्याही प्रकारची चिरफाड न करता ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Fish Bone Stuck In Throat
Fish Bone Stuck In Throat

Fish Bone Stuck In Throat: मासा खातांना त्याचा काटा घशात अडकल्याने एका व्यक्तीला त्रास होत होता. हा काटा घशातील स्वरयंत्रणे जवळ अडकून होता. अनेक उपचार करून देखील हा काटा काढण्यात डॉक्टरांना अपयश आले होते. मात्र, कोकणात चिपळूण तालुक्यात डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात ही अवघड शस्त्रक्रिया कोणत्याही प्रकारची चिरफाड न करता करून करण्यात आली आहे. या शास्त्रक्रियेमुळे दोन महिन्यांपासून घशात अडकून पडलेला काटा काढण्यास डॉक्टरांना यासह आले आहे.

BMC: मुंबईकरांनो काळजी घ्या, २ महिन्यात डासांच्या त्रासाच्या ४,२०० हून अधिक तक्रारी

एका व्यक्तीच्या घशात माशाचा काटा हा अडकून पडला होता. यामुळे या व्यक्तीला त्रास होत होता. तब्बल दोन महिन्यांपासून हा त्रास रुग्ण सहन करत होता. अनेक उपचार करून देखील हा काटा निघत नव्हता. दारमयांम हा काटा स्वरयंत्राजवळ अडकला होता. त्यामुळे ही शस्त्रक्रिया अवघड होती. यात या व्यक्तीची वाणी जाण्याचीही भीती होती.

दोन मैत्रिणींसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये गेला; तिसरीने केली हत्या

दरम्यान, ही व्यक्ति रत्नागिरीच्या डेरवण येथील वालावलकर रूग्णालयात आली. या ठिकाणी डॉक्टरांनी या व्यक्तीची तपासणी केली. घशात अडलेल्या काट्यामुळे या व्यक्तीला गिळताना त्रास होत होता. त्यामुळे घशाला सुज येवून त्याला अन्न गिळता येत नव्हते. चिपळुणा मधील डॉ. ओंकार शर्मा यांनी रूग्णाला वालावलकर रूग्णालयामध्ये एमआरआय आणि सीटी स्कॅन करण्यासाठी आले होते.

दरम्यान, सिटी स्कॅन करताना असे आढळून आले की, घशात माशाचा काटा स्वरयंत्रानजिक अडकलेला आहे. त्यानंतर गेस्टएन्ट्रोलॉजिस्ट सर्जन डॉ. आनंद जोशी, सर्जरी विभागाचे डॉ. मानसिंग घाटगे, सर्जन डॉ. अविनाश गुरूषे, डॉ. संग्राम दाभोळकर ईएनटी विभागाचे डॉ. प्रतिक शहाणे यांनी ही शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. घशामध्ये अडकलेला काटा काढण्याची अत्यंत अवघड शस्त्रक्रिया त्यांनी कोणतीही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे पार पाडत घशातून हा काटा बाहेर काढला. हा काटा घशात ४ सेंटीमीटर रूतला होता. या शास्त्रक्रियेमुळे रुग्ण बरा झाला असून त्याला आता खाणे पिणे देखील शक्य झाले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर