दहावीचे निकाल लागल्यानंतर आता राज्यात अकरावीच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे अकरावीच्या प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी येत्या २७ जून २०२४ रोजी जाहीर करण्यात येणार आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी राज्य सरकारने वेबसाइट तयार केली असून 11thadmission.org.in या वेबसाइटवर जाऊन गुणवत्ता यादी पाहू शकता.
ही गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना या यादीवर काही हरकती असतील किंवा दुरुस्ती अर्ज सादर करायचे असतील तर विद्यार्थी वेबसाइटवरील लॉगिन सेक्शनमध्ये जाऊन 'तक्रार निवारण'द्वारे आपलं म्हणण मांडू शकता. विद्यार्थ्यांना हरकती किंवा दुरुस्ती अर्ज १८ जून ते २१ जून २०२४ या कालावधीत सादर करता येणार आहेत.
विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी पाहण्यासाठी खाली विविध टप्पे दिले आहेत
अकरावी प्रवेशासाठी तयार करण्यात आलेल्या 11thadmission.org.in या राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
महाराष्ट्र FYJC Admission 2024 इयत्ता ११ वी प्रथम गुणवत्ता यादी या लिंकवर क्लिक करा.
लॉगिन तपशील टाका आणि 'Submit' बटणवर क्लिक करा.
एक नवीन पेज उघडेल. या ठिकाणी पहिली गुणवत्ता यादी दिसून येईल.
गुणवत्ता यादी तपासा आणि पृष्ठ डाउनलोड करा.
आवश्यकता असल्याच त्याची हार्ड कॉपी ठेवा.
अकरावी ऑनलाइन प्रवेश क्षेत्र - मुंबई महानगर प्रदेश (MMR), पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच नागपूर, अमरावती आणि नाशिक महानगरपालिकांच्या क्षेत्रांचा समावेश आहे.
इतर बोर्डांशी संलग्न उच्च माध्यमिक शाळेत (महाराष्ट्र राज्य मंडळ वगळून) प्रवेश या प्रवेश प्रक्रियेद्वारे होणार नाहीत. राज्य मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणारे इतर बोर्डांचे विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी उमेदवार शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्रयांचे अधिकृत संकेतस्थळ पाहू शकतात.