HMPV Virus : मुंबईत आढळला HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण, ६ महिन्यांच्या मुलीला लागण, बीएमसी अलर्ट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  HMPV Virus : मुंबईत आढळला HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण, ६ महिन्यांच्या मुलीला लागण, बीएमसी अलर्ट

HMPV Virus : मुंबईत आढळला HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण, ६ महिन्यांच्या मुलीला लागण, बीएमसी अलर्ट

Jan 08, 2025 05:04 PM IST

HMPV Case in Mumbai : ६ महिन्यांच्या मुलीला या व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आलं आहे. तिच्यावर मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आता तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईत आढळला  HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण
मुंबईत आढळला  HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण

HMPV Cases in Mumbai : चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या HMPV व्हायरसची प्रकरणं आता भारतातही वाढताना दिसत आहेत. मुंबई मेंह्युमन मेटापन्युमोव्हायरस (एचएमपीव्ही) चा पहिला रुग्ण आढळला आहे. मुंबईतील पवई परिसरात हीरानंदानी रुग्णालयात (Hiranandani Hospital) दाखल एका ६ महिन्याच्या बाळाला ह्युमन मेटापन्युमोव्हायरसची लागण झाली आहे. याबरोबरच महाराष्ट्रात एचएमपीव्ही रुग्णांची संख्या वाढून सहा तर देशभरात ९ झाली आहे.

६ महिन्यांच्या मुलीला या व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आलं आहे. तिच्यावर मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आता तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुलगी १ जानेवारीपासून रुग्णालयात दाखल होती.

मिळालेल्या माहितीनुसार, खोकला आणि सर्दीच्या संक्रमणामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात दाखल केले होते. संक्रमित मुलीची ऑक्सिजन पातळी ८४ टक्के पर्यंत खाली आली होती. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केले होते. लक्षणे पाहून डॉक्टरांनी तिची रॅपिड पीसीआर टेस्ट केली होती. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

डॉक्टरांनी सांगितले की, एचएमपीव्ही संक्रमित मुलीवर आयसीयूमध्ये उपचार केले होते. पाच दिवसानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले की, या प्रकरणाची त्यांच्याकडे नोंद नाही. मात्र इन्फ्लूएन्झा आणि श्वसनासंबंधित आजारांवर लक्ष ठेवले जात आहे. एचएमपीव्ही विषाणूला घाबरण्याची आवश्यकता नाही. या आजार पसरण्यापासून रोकण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.

एचएमपीव्ही व्हायरस म्हणजे काय?

मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे ज्यामुळे सामान्यत: सौम्य सर्दीसारखी लक्षणे उद्भवतात. अभ्यासानुसार हे १९७०च्या दशकापासून मानवी लोकसंख्येत पसरले आहे, जरी शास्त्रज्ञांनी २०११ मध्ये प्रथम ओळखले होते. जागतिक स्तरावर तीव्र श्वसन संसर्गामध्ये या विषाणूचे प्रमाण ४-१६टक्के आहे, सामान्यत: नोव्हेंबर ते मे दरम्यान प्रकरणे शिगेला पोहोचतात. बहुतेक प्रौढांनी मागील प्रदर्शनाद्वारे प्रतिकारशक्ती विकसित केली आहे, परंतु एचएमपीव्हीमुळे प्रथमच त्याचा सामना करणार्या अर्भकांमध्ये आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांमध्ये अधिक गंभीर लक्षणे उद्भवू शकतात.

एचएमपीव्हीविषाणूचा मूत्रपिंडावर होतो परिणाम?

पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ नेफ्रोलॉजी अँड युरोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट डॉ. बी. विजयकिरण यांनी सांगितले की, "नुकत्याच झालेल्या संशोधनात एचएमपीव्ही आणि मूत्रपिंडाच्या आरोग्यामधील गुंतागुंतीचे संबंध समोर आले आहेत. रुग्णालयात दाखल मुलांवरील अभ्यासानुसार असे आढळले आहे की एचएमपीव्ही संसर्ग मूत्रपिंडाच्या दुखापतीशी (एकेआय) संबंधित असू शकतो. संशोधनात असे सूचित केले गेले आहे की वयानुसार AKIजोखीम वाढते आणि मूत्रपिंडाची दुखापत श्वसनाच्या गुंतागुंतांशी काटेकोरपणे संबंधित असू शकत नाही.

कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडूनंतर आता महाराष्ट्रातही या व्हायरसने प्रवेश केला आहे. नागपुरात दोन मुलांना एचएमपीव्ही व्हायरसची लागण झाल्याचं आढळून आलंहोतं आता हा विषाणू मुंबईत दाखल झाला आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर